दीक्षेचे आध्यात्मिक महत्त्व आणि तिचे प्रकार !

१. दीक्षा देण्याचे आध्यात्मिक महत्त्व

सुश्री (कु.) मधुरा भोसले

‘अध्यात्मात केवळ स्वतःच्या मनाने किंवा ग्रंथ वाचून साधना केल्याने आध्यात्मिक उन्नती होत नसून, एखाद्या आध्यात्मिक उत्तराधिकार्‍याच्या मार्गदर्शनाखाली साधना केल्याने शीघ्र आध्यात्मिक उन्नती होते; पण यासाठी व्यक्तीने स्वतःच्या मनाने कुणालाही गुरु मानू नये. याउलट ‘गुरूंनी आपल्याला ‘शिष्य’ म्हणून स्वीकारले पाहिजे.’ जेव्हा गुरु एखाद्या साधकाला शिष्य स्वरूपात स्वीकारतात, तेव्हा बहुतांश वेळा ते त्याला ‘दीक्षा’ देतात. दीक्षा दिल्यामुळे तो साधक त्या गुरूंचा शिष्य होतो आणि गुरूंची दैवी शक्ती शिष्यात संक्रमित होऊ लागल्याने त्याच्यावर गुरुकृपा होऊन त्याची पुढील साधना चालू रहाते.

२. दीक्षेचे प्रकार

२ अ. पारंपरिक दीक्षा : परंपरेनुसार प्रचलित असणार्‍या दीक्षांना ‘पारंपरिक दीक्षा’, असे संबोधले जाते.

२ अ १. नामदीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला भगवंताचा विशिष्ट नामजप सांगून दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘नामदीक्षा’ म्हणतात.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

२ अ १ अ. गुरु संत तुकामाई आणि शिष्य ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज : संत तुकामाई यांनी ‘गणपति’ नावाच्या १६ वर्षांच्या बालकाची ९ मास कसून परीक्षा घेतल्यानंतर त्याला ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ या रामनामाची दीक्षा दिली आणि त्यांचा उजवा हात त्या बालकाच्या डोक्यावर ठेवला. तेव्हा ते बालक खोल समाधीत लीन झाले. त्यानंतर संत तुकामाईंनी त्या बालकाला समस्त ज्ञान देऊन त्याचे आत्मतत्त्व प्रगट केले. तेव्हा तो बालक ‘ब्रह्मचैतन्य’ या नावाने विख्यात झाला. त्यांना नंतर लोक ‘श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज’ असे म्हणू लागले. (सौजन्य : https://shrigondavalekarmaharaj-org. translate. goog/ maharaj/ home.html?)

२ अ २. शब्ददीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला भगवंताचा विशिष्ट शब्द सांगून दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘शब्ददीक्षा’ म्हणतात.

संत निवृत्तीनाथ महाराज

२ अ २ अ. गुरु गहिनीनाथ आणि शिष्य संत निवृत्तीनाथ : संत गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांना ‘जय अलख निरंजन’ म्हणून शब्ददीक्षा दिली. या दीक्षेमुळे त्यांच्यावरील मायेचे आवरण दूर होऊन त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले आणि त्यांची वाटचाल संतत्वाकडून गुरुपदाकडे चालू झाली. त्यामुळे संत निवृत्तीनाथांचे चित्त मोह, माया या बंधनांच्या पलीकडे जाऊन भगवंताच्या चरणी स्थिर झाले होते. त्यामुळे जेव्हा त्यांच्या माता-पित्यांनी देहान्त प्रायश्चित्त घेतले, तेव्हा गुरु निवृत्तीनाथांनी संत ज्ञानेश्वर, संत सोपानदेव आणि संत मुक्ताबाई यांना धीर देऊन त्यांना दुःखातून सावरले. (संदर्भ : https://en.wikipedia.org/wiki/Nivruttinath )

२ अ ३. मंत्रदीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला भगवंताचा विशिष्ट मंत्र सांगून दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘मंत्रदीक्षा’ म्हणतात.

श्रीनृसिंह सरस्वती

२ अ ३ अ. गुरु दत्तात्रेय आणि शिष्य श्रीनृसिंह सरस्वती : नृसिंह सरस्वती जन्मापासून वयाच्या ८ व्या वर्षापर्यंत केवळ ‘ॐ’ हे अक्षर म्हणत होते; परंतु त्यांनी अन्य एकही शब्द उच्चारला नव्हता. जेव्हा त्यांची वयाच्या ८ व्या वर्षी मुंज करण्यात आली, तेव्हा त्यांच्या कानात गायत्री मंत्र उच्चारण्यात आला. तेव्हा नृसिंह सरस्वती यांना दत्तगुरूंकडून सूक्ष्मातून दीक्षा मिळाली. अशा प्रकारे नृसिंह सरस्वती यांना मंत्रदीक्षा मिळाली आणि त्यांनी घडाघडा चारही वेदांतील मंत्र म्हणून दाखवले. (संदर्भ : (https://en.wikipedia.org/wiki/Narasimha_Saraswati)

२ अ ४. बीजमंत्र दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला भगवंताचा विशिष्ट बीजमंत्र सांगून दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘बीजमंत्र दीक्षा’ म्हणतात.

परशुराम

२ अ ४ अ. गुरु शिव आणि शिष्य परशुराम : भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम जन्माला आला. तेव्हा शिवाने त्याला सूक्ष्मातून ‘शिष्य’ म्हणून स्वीकारले आणि ‘ॐ’ या बीजमंत्राची दीक्षा दिली. त्यामुळे परशुराम जन्माला येताच त्याने ‘ॐ’काराचा उच्चार केला. या ‘ॐ’ काररूपी बीजमंत्राच्या दीक्षेने पृथ्वीचे संपूर्ण वायूमंडल दुमदुमून निघाले. (सौजन्य : https://www.livehindustan.com/astrology/story-parshuram-is-the-joint-incarnation-of-lord-shiva-and-lord-vishnu-1905221.html आणि (संदर्भ : मला सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)

२ अ ५. अंकदीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला भगवंताचा विशिष्ट अंक सांगून दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘अंकदीक्षा’ म्हणतात.

गुरुनानक

२ अ ५ अ. शिष्य गुरुनानक : गुरुनानक यांना त्यांच्या वडिलांनी त्यांचे दुकान चालवण्यासाठी दिले. तेव्हा एका गिर्‍हाईकाला वस्तू विकल्यानंतर ते हिंदीत बेरीज करतांना ‘१३’ या अंकापर्यंत आले. हिंदीमध्ये ‘१३’ म्हणजे ‘तेरा’ याचा अर्थ ‘तुझे’ असा होतो. हा अर्थ त्यांच्या मनावर कोरला गेला आणि त्यांना याची जाणीव झाली की, ‘ये तेरा’ म्हणजे ‘यावर त्या भगवंताचे अस्तित्व आहे.’ अशा प्रकारे गुरुनानक यांना ‘१३’ या अंकाचा जप केल्याने आत्मबोध झाला आणि ते गाढ समाधीत लीन झाले. अशा प्रकारे त्यांना ईश्वराकडून मिळालेल्या अंकदीक्षेमुळे ते संत झाले. (संदर्भ : https:// www. discoversikhism.com/sikh_gurus/guru_nanak_13.html)

२ आ. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दीक्षा

२ आ १. प्रत्यक्ष दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला प्रत्यक्ष हस्तस्पर्श किंवा पदस्पर्श करून दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘प्रत्यक्ष दीक्षा’ म्हणतात.

संत कबीर

२ आ १ अ. गुरु रामानंदाचार्य आणि शिष्य संत कबीर : गुरु रामानंदाचार्य काशीमध्ये असतांना प्रतिदिन ब्राह्ममुहूर्तावर काशीच्या घाटावर जाऊन गंगानदीत स्नान करत. ‘त्यांचा पदस्पर्श होऊन दीक्षा मिळावी’, यासाठी कबीर घाटावरील एका पायरीवर पहुडले. तेव्हा सूर्याेदय झालेला नसल्याने सर्वत्र अंधार होता. गुरु रामानंदाचार्य यांना सुस्पष्ट दिसले नाही आणि त्यांच्या पायाच्या अंगठ्याचा स्पर्श कबिराच्या भ्रूमध्याला झाला आणि ते एकदम सावध झाले. त्या वेळी त्यांच्या मुखातून अकस्मात् ‘राम, राम’ हे शब्द निघाले. कबिराने श्री गुरुचरणांच्या स्पर्शालाच प्रत्यक्ष दीक्षा आणि ‘राम’नामालाच गुरुमंत्र मानून गुरु रामानंदाचार्यांचे शिष्यत्व मिळाल्याचे समाधान मानले. त्यानंतर कबीर रामनामाचा जप करत संतपदी पोचले. (संदर्भ : https://indianculture. gov. in/hi /stories / santa-kabaira-daasa-kaa-jaivana)

चैतन्य महाप्रभू

२ आ १ आ. गुरु ईश्वर पुरी आणि शिष्य चैतन्य महाप्रभू : ‘मध्व’ संप्रदायाचे अनुयायी गुरुदेव ईश्वर पुरी यांची भेट गया क्षेत्री शिष्य गौरांगशी होते. त्याची ईश्वरप्राप्तीची तीव्र तळमळ पाहून त्यांनी गौरांगाला भगवी वस्त्रे देऊन संन्यास दीक्षा दिली अन् त्याचे नामकरण ‘श्रीकृष्ण चैतन्य भारती’ असे केले; परंतु पुढे त्यांनी ‘चैतन्य महाप्रभू’ या नावाने विख्यात झाले. त्यानंतर ते चैतन्य महाप्रभूंना ‘नवद्वीप’ या क्षेत्रात जाऊन भक्तीचा प्रसार करण्यास सांगितले.(सौजन्य:https://en.wikipedia.org/wiki/Isvara_Puri#:~:text=Isvara%20Puri%20was%20a%20monk,him%20into%20the%20Gopal%2Dmantra.)
आणि(https://www.google.com/search?q = what+was+the+former+name+of+chaitanya+mahaprabhu) (आणि मला सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान)

२ आ २. अप्रत्यक्ष दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला प्रत्यक्ष हस्तस्पर्श किंवा पदस्पर्श न करता सूक्ष्मातून दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘अप्रत्यक्ष दीक्षा’ म्हणतात.

एकलव्य

२ आ २ अ. गुरु द्रोणाचार्य आणि शिष्य एकलव्य : एकलव्याने गुरु द्रोणाचार्य यांचा पुतळा बनवून त्यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या सूक्ष्मातून दीक्षा घेऊन त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. त्यामुळे एकलव्याला द्रोणाचार्यांकडून सूक्ष्म स्तरावर धनुर्विद्येचे ज्ञान मिळून तो धनुर्विद्येत निपुण झाला.

(सौजन्य : https://wisdom.srisriravishankar.org/story-eklavya- evotion/

२ इ. विविध प्रकारच्या अवस्थेनुसार दिलेली दीक्षा

२ इ १. जागृत अवस्थेतील दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला जागृत अवस्थेत दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘जागृत अवस्थेतील दीक्षा’ म्हणतात.

२ इ १ अ. गुरु देवर्षि नारद आणि शिष्य वाल्या कोळी : एका मतानुसार वाल्या कोळी आणि दुसर्‍या मतानुसार रत्नाकर या दरोडेखोराला देवर्षि नारद यांनी प्रत्यक्ष स्थुलातून भेटून ‘राम’नामाची दीक्षा दिली. रामनामाचा जप करत वाल्या कोळीचा वाल्मीकि ऋषि झाले. (सौजन्य : https://www.parentcircle.com/maharishi-valmiki-the-transformation-of-a-robber-into-adikavi/article

२ इ २. स्वप्न अवस्थेतील दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला स्वप्न अवस्थेत दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘स्वप्न अवस्थेतील दीक्षा’ म्हणतात.

२ इ २ अ. गुरु बाबाजी चैतन्य आणि शिष्य संत तुकाराम महाराज : संत तुकाराम यांचे गुरु बाबाजी चैतन्य यांनी त्यांना स्वप्नदृष्टांत देऊन ‘जय जय रामकृष्ण हरि ।’ या नामजपाची दीक्षा दिली. त्यामुळे तुकोबा संत तुकाराम झाले. (सौजन्य : https://spiritual-heritage-of-india.blogspot.com/2018/10/sant-tukaram.html)

२ इ ३. सुषुप्ती अवस्थेतील दीक्षा : जेव्हा गुरु शिष्याला सुषुप्ती अवस्थेत दीक्षा देतात, तेव्हा तिला ‘सुषुप्ती अवस्थेतील दीक्षा’ म्हणतात.

२ इ ३ अ. गुरु शिव आणि शिष्य पार्वती : शिवाने अमरनाथ गुहेत गेल्यावर पार्वतीस डोळे मिटण्यास सांगितले. ती सुषुप्ती अवस्थेत गेल्यावर तिला दीक्षा देऊन ब्रह्मज्ञान दिले.  (क्रमशः)

– सुश्री मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक :१८.९.२०२४)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

सूक्ष्म-जगत् : जे स्थूल पंचज्ञानेंद्रियांना (नाक, जीभ, डोळे, त्वचा आणि कान यांना) कळत नाही; परंतु ज्याच्या अस्तित्वाचे ज्ञान साधना करणार्‍याला होते, त्याला ‘सूक्ष्म-जगत्’ असे संबोधतात.

सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.

लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा- https://sanatanprabhat.org/marathi/957024.html