|
(‘कॉल सेंटर’ म्हणजे ग्राहकांना ऑनलाईन सेवा पुरवणारे आस्थापन)

नाशिक – ब्रिटनमधील नागरिकांना पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणार्या खुटवडनगर येथे अवैध ‘कॉल सेंटर’वर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (‘सीबीआय’ने) धाड घातली. मुख्य संशयित गणेश विष्णू कामणकर, श्याम कामणकार यांच्यासह मुंबई येथील इतर चौघांना अटक करण्यात आली. इगतपुरी येथील एका ‘रिसॉर्ट’वरील धाडीनंतर महिन्यातील ही दुसरी कारवाई आहे. अन्वेषण विभागाने आस्थापनातून बनावट विमा पॉलिसीची संहिता, ८ भ्रमणभाष, ८ संगणक संच, ‘सर्व्हर’ची प्रणाली अन् ५ लाख रुपयांची रोकड यांसह ‘डिजिटल’ पुरावे जप्त केले.
🚨 Nashik: CBI busts illegal call center cheating UK citizens with fake insurance – 4 arrested
⚖️ FIR at CBI Thane
– ₹5L cash, mobiles, PCs & fake scripts seized
– 60+ staff posed as brokers & officials under “Swagan Business Solutions”
💥 Fraudsters must not only face jail… pic.twitter.com/2uXKviOORs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 15, 2025
खुटवडनगर येथे ‘मेसर्स स्वॅगन बिझनेस सोल्युशन्स प्रा.लि.’ या नावाने ‘कॉल सेंटर’ चालवले जात होते. धाडीच्या वेळी ६० हून अधिक कर्मचारी संगणकावर काम करतांना आढळले. विमा दलाल, तसेच सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून ते यु.के.तील नागरिकांची फसवणूक करत होते. या प्रकरणी ‘सीबीआय’च्या ठाणे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. नाशिक येथील दोघांसह विद्या जाधव, विवेक तिवारी, शरद राव आणि रॉबर्ट यांना अटक झाली असून उर्वरित १० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयितांना ठाणे सीबीआय विशेष न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
संपादकीय भूमिकाअशांनी आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली, याचा शोध घेऊन संबंधित रक्कम त्यांच्याकडून सव्याज वसूल करून घ्यायला हवी ! |
तलाकच्या धमकीप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंद !
कर्नाटकात २ पाकिस्तानी घुसखोरांना अटक
Badrinath Donation Theft : बद्रीनाथ धाममधील चोरीच्या प्रकरणी एकास अटक
दौसा (राजस्थान) येथे हिंदु तरुणीवर सामूहिक बलात्कार : ३ मुसलमानांना अटक
‘रोटरी क्लब ऑफ हुपरी’च्या वतीने १५० गरजू मुलींना विनामूल्य सायकलवाटप
पंढरपूर मंदिर परिसर विकास प्रकल्पात नागरिकांचा विश्वास जपणे महत्त्वाचे ! – डॉ. नीलम गोर्हे