(म्हणे) ‘हिंदु समाजात जर समानता आणि संधी असती, तर कुणी धर्मांतर का केले असते ?’ – Siddaramaiah

कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हिंदुद्वेषी प्रश्न

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – आपण म्हणतो धर्मांतर करू नका, तरी काही लोक व्यवस्थांमुळे धर्मांतर करतात. आपल्या हिंदु समाजात जर समानता आणि संधी असती, तर कुणी धर्मांतर का केले असते ?, असा प्रश्न कर्नाटकातील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, हिंदु समाजाने अस्पृश्यता निर्माण केली आहे. (हिंदु समाजातील अस्पृश्यता हिंदूंनीच नष्ट केली आहे; मात्र इस्लाम आणि ख्रिस्ती यांच्यातील धर्मांधता ते कधीही नष्ट करत नाहीत, हे सिद्धरामय्या का सांगत नाहीत ? – संपादक) तसेच इस्लाम, ख्रिस्ती किंवा इतर कोणत्याही धर्मांतही असमानता असू शकते. आपण किंवा भाजपने कुणालाही धर्मांतर करण्यास सांगितले नाही, हा लोकांचा अधिकार आहे आणि ते स्वतःच्या इच्छेनुसार धर्मांतर करतात.

संपादकीय भूमिका

ख्रिस्ती मिशनरी आणि धर्मांध मुसलमान यांच्या आमीषामुळे नाही किंवा त्यांच्या फसवणुकीमुळे नाही, तर ‘हिंदु धर्मात समानता नसल्याने हिंदू धर्मांतर करतात’, असे म्हणणारे सिद्धरामय्या मिशनरी अन् धर्मांध मुसलमान यांचे हस्तक आहेत, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये !