Owaisi NCERT : (म्हणे) ‘भारताच्या फाळणीची पहिली मागणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली; मुसलमानांनी नाही !’

एन्.सी.ई.आर्.टी. अभ्यासक्रमातील पालटांवरून असदुद्दीन ओवैसी यांचा दावा

असदुद्दीन ओवैसी

भाग्यनगर (तेलंगाणा) – ए.आय.एम्.आय.एम्. (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन, अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी एन्.सी.ई.आर्.टी. (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) अभ्यासक्रमातील पालटांवरून भाजप सरकारवर टीका केली आहे.

ते म्हणाले की, ‘सुधारित अभ्यासक्रमात भारताच्या विभाजनासाठी मुसलमान समाजाला उत्तरदायी धरले गेले आहे; पण खरी गोष्ट अशी आहे की, विभाजनाची कल्पना सर्वप्रथम सावरकर यांनी मांडली होती. त्याचे दायित्व माऊंटबॅटन आणि त्या वेळचे काँग्रेस सरकार यांचे होते. फाळणीसाठी मुसलमानांना दोषी धरता येणार नाही.’

पंडित नथुराम गोडसे यांच्याविषयीची माहिती काढून टाकल्याचा आरोप

खासदार ओवैसी यांनी पुढे म्हटले की, नथुराम गोडसे याने म. गांधी यांची हत्या केली, हेही अभ्यासक्रमातून काढून टाकले आहे. ‘गोडसेने गांधींना का ठार मारले ?’, हे तुम्ही का हटवले ?

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचे विधान करून ओवैसी भारतियांना मूर्ख समजतात का ? या विधानावरून त्यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहातच डांबले पाहिजे !