मुंबई – पृथ्वीच्या इतिहासात प्रथमच नैऋत्य मौसमी पाऊस अर्थात् मॉन्सून हिमालय ओलांडून तिबेटमध्ये पोचला आहे. यामुळे जगात भयानक परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या असामान्य घटनेने शास्त्रज्ञांचे लक्ष वेधून घेतले आहे. मॉन्सूनचे ढग हिमालय पर्वतांवर आदळल्यानंतर भारताकडे परत फिरतात आणि भारतातील पर्वतीय आणि सपाट भागांत पाऊस पाडतो. हवामानशास्त्रज्ञांच्या मते जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता संपूर्ण हिमालयीन प्रदेशात स्पष्टपणे दिसून येत आहेत. येणार्या काळात ही समस्या अधिक गंभीर होऊ शकते आणि त्याचे भयानक परिणाम दिसू शकतात.
🌏 Climate shock! For the first time in Earth’s history, the southwest monsoon has crossed the Himalayas into Tibet.
📌 Scientists at Wadia Institute of Himalayan Geology found this rare event in Ladakh’s Zanskar valley.
📌 Rising temps push clouds 2000m higher, now breaching… pic.twitter.com/a7NPsFWGFX
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 14, 2025
१. ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी’च्या शास्त्रज्ञांच्या पथकाने लडाखच्या झंस्कर खोर्यात संशोधन करतांना काही आश्चर्यकारक गोष्टी शोधल्या आहेत. संस्थेच्या शास्त्रज्ञांच्या मते मॉन्सूनची हिमालय ओलांडून तिबेटकडे जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. तिबेट हा एक पठार प्रदेश आहे आणि जर या प्रदेशात मुसळधार पाऊस पडला, तर तो विनाश घडवून आणेल. पावसाळ्यात हिमालयाच्या अनेक भागांत बर्फवृष्टी चालू झाल्याचे पाहून शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
२. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सहस्रो वर्षांपासून हा क्रम चालू आहे की, मॉन्सूनचे ढग हिमालयावर आदळतात आणि भारतात मोठा जलसाठा निर्माण करतात. सध्याच्या वातावरणामुळे हिमालयीन प्रदेशात अतीवृष्टी होत असून त्यामुळे विद्ध्वंस होत आहे. संशोधनानुसार, हवामान उष्ण होत चालले आहे. त्यामुळे ढगही उंच होत आहेत. ढग हिमालयापासून २ सहस्र मीटर उंचीवरून पुढे सरकत आहेत. केदारनाथसारख्या भागात अधिक पाऊस पडण्याचे हेच कारण आहे.
३. या घटनेमुळे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि जम्म-काश्मीर यांसारख्या राज्यांमध्ये भीषण पूर, ढगफुटी अन् भूस्खलन यांमुळे मोठी हानी झाली असून अनेकांचे प्राण गेले आहेत.

Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक