|

नवी देहली – देहली पोलिसांनी एका मोठ्या आतंकवादी गटाच्या कारवायांचा बुरखा फाडून वेगवेगळ्या राज्यांतून आतापर्यंत ५ आतंकवाद्यांना अटक केली आहे. १० सप्टेंबरला झारखंडची राजधानी रांची येथील इस्लामनगर भागातून अशर दानिश आणि देहलीतून आफताब यांना अटक करण्यात आली होती. आता मुंबईतील आतंकवादी सुफियान याला देहलीतून अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून बाँब बनवण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. अन्वेषणात असे दिसून आले आहे की, हे सर्व इस्लामिक स्टेटशी जोडलेल्या ‘स्लीपर सेल्स’चा (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या धर्मांधांच्या स्थानिक गटाचा) भाग आहेत आणि सणासुदीच्या काळात राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात आक्रमण करण्याची योजना आखत होते. देशातील एका मोठ्या आतंकवादी कटाला उधळून लावण्यात ही कारवाई एक मोठे यश मानले जात आहे.
🚨 Major Terror Plot Foiled!
⚡ 5 terrorists arrested from Delhi, Mumbai & Jharkhand – mastermind Ashar Danish (Bokaro) caught with weapons & chemicals
👉 Patriots say: India must act like Israel & crush Pakistan-backed terror#BoycottAsiaCup #indiaVsPakistan
PC: @VocalBharatX pic.twitter.com/qB5Zy7JByR— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) September 12, 2025
१. अशर हा बोकारोचा रहिवासी आहे. त्याला तबरक लॉजमधून शस्त्रे आणि रसायने यांसह पकडण्यात आले होते. तो या गटाचा प्रमुख (मास्टरमाइंड) आहे.
२. मुंबईतील रहिवासी आफताबला देहलीतून अटक करण्यात आली होती.
३. पोलीस यंत्रणा या सगळ्यांचा विदेशी आतंकवाद्यांशी, विशेषतः पाकिस्तानी गुप्तचर संस्था ‘आय.एस्.आय.’शी असलेल्या संबंधांचीही चौकशी करत आहेत.
कुणी केली कारवाई ?
दिल्ली पोलिसांचे विशेष पथक, झारखंड आतंकवादविरोधी पथक आणि रांची पोलीस यांच्या संयुक्त कारवाईद्वारे अटक करण्यात आल्या.
धाडींमध्ये मिळाले राजधानी देहलीचे नकाशे !
या संपूर्ण कारवाईत देहली, मुंबई, रांची यांसह १२ हून अधिक ठिकाणी धाडी घालण्यात आल्या. विविध शहरांत घातलेल्या धाडींमधून हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फर पावडर, एक पिस्तूल, डिजिटल उपकरणे आणि देहलीचे नकाशे जप्त करण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकापाकपुरस्कृत आतंकवाद्यांना पकडण्यासमवेतच पाकिस्तानचा नायनाट होण्यासाठी आता भारताने इस्रायलसारखी धडक कारवाई केली पाहिजे, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा ! |
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती