पनवेलमध्ये १०० बहुवार्षिक वृक्ष लावणार !

पनवेल – येथील तालुका पत्रकार मंचाच्या वतीने ‘साक्षरतादिना’च्या औचित्याने ‘वृक्ष संवर्धन साक्षरता दिना’चे आयोजन करण्यात आले होते. इंडियन ऑइल, पनवेल तालुका पत्रकार विकास मंच आणि पनवेल महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडलेल्या या कार्यक्रमात भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभहस्ते ‘माझे झाड’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला भाजपचे आमदार विक्रांत बाळासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाचे अध्यक्ष मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक केले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम हाती घेण्यासाठी आयोजकांची प्रशंसा करून ‘वृक्ष संवर्धन ही काळाची आवश्यकता आहे’, असे मत व्यक्त केले. आमदार विक्रांत पाटील यांनी वृक्ष संवर्धनाचे माहात्म्य कथन केले आणि उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या उपक्रमांतर्गत पनवेल महापालिका हद्दीत १०० बहुवार्षिक वृक्ष लावून त्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे.
पनवेल तालुका पत्रकार मंचाच्या वतीने सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील, सल्लागार विवेक पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, खजिनदार संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, प्रवीण मोहोकर, नितीन कोळी, राजू गाडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Farmers’ March Postponed : पंजाबच्या शेतकर्यांचा देहलीमध्ये काढण्यात येणारा मोर्चा पुढे ढकलला
स्मार्ट वीजमीटरला विरोध करणार्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न ! – सिंधुदुर्ग वीज ग्राहक संघटना, दोडामार्ग शाखा
युवती महिला संस्कार सबलीकरणाच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद-राष्ट्रीय बजरंग दलाच्या वतीने कार्यक्रम !
लोहियानगर (पुणे) येथील आधुनिक वैद्यांनी पिस्तुल दाखवून दिली जिवे मारण्याची धमकी !