(बी.एल्.ए., म्हणजेच ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी.’ ही संघटना बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र करण्यासाठी लढा देणारी सशस्त्र क्रांतीकारक संघटना आहे.)

क्वेटा (बलुचिस्तान) – पाकच्या कह्यात असलेल्या बलुचिस्तान प्रांतात ‘बलुचिस्तान लिबरेशन आर्मी’ या क्रांतीकारक संघटनेने पुन्हा एकदा पाकिस्तानी सैन्यावर आक्रमण केले. बलुचिस्तानमधील जमरान आणि कलाट येथे सैन्याचे वाहन स्फोटाद्वारे उडवून देण्यात आले. अन्य एका सैनिकी चौकीवरही आक्रमण करण्यात आले. या आक्रमणांत १० सैनिक ठार झाले आहेत. ‘बी.एल्.ए.’ने या आक्रमणाचा व्हिडिओही प्रसारित केला आहे.
‘व्हॉइस ऑफ खोरासान’च्या वृत्तानुसार जमरान जिल्ह्यातील नोवानो भागात ‘बी.एल्.ए.’ने एका सैनिकी ताफ्याला ‘रिमोट कंट्रोल बाँब’ने लक्ष्य केले. या वेळी वाहनातील सर्व ९ सैनिक जागीच ठार झाले. कलाटच्या मोरगंद भागात एका सैनिकी चौकीवर आक्रमण झाले. यात १ सैनिक ठार झाला, तर २ जण घायाळ झाले.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman