आतंकवाद्यांना प्रोत्साहन देणारा झाकीर नाईक आणि चीन सरकार यांच्याकडून मिळालेल्या निधीवर प्रश्नचिन्ह

भुवनेश्वर (ओडिशा) – पोलिसांनी ‘राजीव गांधी फाउंडेशन’ला (आर्.जी.एफ्.ला) पाठवलेल्या नोटिसीमध्ये विदेशी देणग्या, बँक खाती आणि वादग्रस्त स्रोतांकडून मिळालेल्या देणग्या यासंबंधी तपशीलवार नोंदी सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या वर्षाच्या प्रारंभी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविरुद्ध भारतविरोधी वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली नोंदवलेल्या गुन्ह्याच्या संदर्भात ही नोटीस पाठवण्यात आली आहे.
१. राहुल गांधी हे ‘राजीव गांधी फाउंडेशन’च्या बोर्ड सदस्यांपैकी एक आहेत. त्याचे इतर सदस्य सोनिया गांधी (अध्यक्षा), प्रियंका गांधी वाड्रा, पी. चिदंबरम्, सुमन दुबे, अशोक गांगुली, मोंटेक सिंह अहलुवालिया आणि विजय महाजन आहेत.
२. नोटिसीमध्ये म्हटले आहे की, राजीव गांधी फाउंडेशनला वर्ष २०११ मध्ये वादग्रस्त इस्लामी धर्मोपदेशक झाकीर नाईक याच्याकडून, तसेच वर्ष २००५-०६ मध्ये चीन सरकारकडून २ कोटी ६४ लाख रुपयांची देणगी मिळाली होती. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात पंतप्रधान साहाय्यतानिधी आणि अर्थ मंत्रालयातील निधी फाउंडेशनकडे वळवण्यात आला होता, असाही आरोप नोटीशीत करण्यात आला आहे.
३. राम हरि पुजारी नावाच्या व्यक्तीने प्रविष्ट (दाखल) केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आली आहे. त्यात पुढे असे म्हटले आहे की, त्यांनी भारताच्या विरुद्ध युद्ध पुकारून देशाविरुद्ध बंड पुकारले आहे.
४. राहुल गांधी यांनी १५ जानेवारी २०२५ या दिवशी देहलीतील कोटला रोड येथील नवीन काँग्रेस मुख्यालयाचे उद्घाटन करतांना दिलेल्या भाषणात दावा केला होता की,
भाजप आणि संघ यांनी देशातील प्रत्येक संस्था कह्यात घेतली आहे. आम्ही आता भाजप आणि संघ यांच्याशी लढत आहोत. त्यानंतर राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
संपादकीय भूमिकागांधी घराण्याकडून चालवण्यात येणारी संस्था भारताच्या विरोधकांकडून पैसे मिळवते. यावरून या घराण्याची राष्ट्रघातकी मनोवृत्ती दिसून येते ! |
५ जून : पू. गोळवलकर गुरुजी यांचे पुण्यस्मरण (दिनांकानुसार)
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !