Kerala Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित फुलांची कलाकृती बनवल्यामुळे केरळ पोलिसांकडून हिंदूंवर गुन्हा नोंद !

‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित फुलांची कलाकृती

थिरूवनंतपूरम् (केरळ) – हिंदूंनी ‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित ‘पुक्कलम्’ (फुलांची कलाकृती) बनवल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. काही हिंदूंवर  छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले फलक उभारल्याविषयी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. (एका महापुरुषाचे चित्र असलेले फलक लावल्यावर पोलिसांना पोटशूळ का उठतो ? – संपादक)

१.  ४ सप्टेंबर या दिवशी केरळच्या कोल्लम् जिल्ह्यातील मुथुपिल्लक्कड येथील श्री पार्थसारथी मंदिराच्या परिसरात काही हिंदूंनी ‘ऑपरेशन सिंदूर’च्या स्मरणार्थ काही कलाकृती बनवल्या.

२. दंगल घडवण्याच्या उद्देशाने फुलांची कलाकृती आणि छत्रपती शिवाजी महाराजांची फलक लावले, असा करत केरळ पोलिसांनी हिंदूंच्या विरोधात गुन्हा नोंद केला. (‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यामुळे केरळमध्ये कुणाला त्रास झाला आणि त्यामुळे दंगल कुणाला घडवावीशी वाटते, हे हिंदूंना ठाऊक आहे ! – संपादक)

३. केरळ भाजपने या अन्याय्य पोलीस कारवाईचा निषेध केला आणि गुन्हे त्वरित मागे घेण्याची मागणी केली. ‘केरळ हा पाकिस्तान नाही, जिथे भारतीय सशस्त्र दलांचे शौर्य साजरे करणे, हा गुन्हा ठरेल’, असे भाजपने म्हणले आहे.

संपादकीय भूमिका

‘ऑपरेशन सिंदूर’वर आधारित कलाकृती बनवणार्‍या हिंदूंवर गुन्हे नोंदवणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?