
नवी देहली – शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. शिक्षकांच्या समर्पणाची आणि कठोर परिश्रमाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. पंतप्रधानांनी माजी राष्ट्रपती आणि शिक्षक डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले. त्यापूर्वी म्हणजे ४ सप्टेंबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित ४५ शिक्षकांना संबोधित केले. या वेळी पंतप्रधानांनी मुलांमध्ये उपक्रम आणि प्रकल्प चालू करून शाळांमध्ये ‘स्वदेशी’ वस्तूंना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांना आवाहन केले. ‘शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांना गृहपाठ देण्याचे काम करतात; म्हणून आज मी तुम्हाला गृहपाठ दिला आहे. तुम्ही तो पूर्ण कराल, असा मला पूर्ण विश्वास आहे’, असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,
१. शिक्षकांनी शाळांमध्ये ‘मेक इन इंडिया’ प्रकल्प आणि उपक्रम राबवावेत. यामध्ये मुलांना स्वदेशी उत्पादने ओळखण्यास शिकवले पाहिजे. त्यांना ‘स्वदेशी’ उत्पादने खरेदी करायला प्रोत्साहन दिले पाहिजे.
२. शिक्षक ‘व्होकल फॉर लोकल’ (स्थानिक स्तरावर बनवलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याची मोहीम) मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. शाळांमध्ये स्वदेशी उत्पादनांचे महत्त्व सांगून उत्सव साजरे केले पाहिजेत आणि मुलांना ‘कला विषया’च्या तासिकेच्या वेळी स्वदेशी साहित्यापासून सजावटीच्या वस्तू बनवायला शिकवल्या पाहिजेत. यामुळे लहानपणापासूनच मुलांमध्ये स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याची भावना वाढेल.
३. शाळांमध्ये ‘स्वदेशी दिवस’, ‘स्वदेशी आठवडे’ आणि ‘स्थानिक उत्पादन दिवस’ साजरे केले पाहिजेत. या अंतर्गत मुलांनी त्यांच्या कुटुंबांतून स्थानिक उत्पादने आणावीत आणि ती कशी बनवली गेली आहेत, याची माहिती सर्वांना द्यावी. त्यामुळे शाळेत स्वदेशीचे वातावरण निर्माण होऊ शकते.
४. तरुण मुलांमध्ये देशभक्ती, आत्मविश्वास आणि श्रम यांच्या प्रतिष्ठेचे मूल्य वाढवून ते जीवनाचा एक भाग बनवले पाहिजे.
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !