कृत्रिम हौद विसर्जन प्रक्रियेला प्रतिसाद नाही

चिपळूण, ३ सप्टेंबर (वार्ता.) – पर्यावरणाची होणारी हानी रोखण्यासाठी कृत्रिम हौदामध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन करावी, असा पर्याय शासनाने दिला होता. या पर्यायाला धुडकावून येथील हिंदु बांधवांनी धर्मशास्त्राला महत्त्व देत नदीपात्रात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले.
येथील नाईक पूल येथे नगर परिषदेने उभारलेल्या कृत्रिम हौदात कुणीही विसर्जन केले नाही. ‘या हौद निर्मितीसाठी जनतेचा पैसा वाया घालवला जात आहे’, अशा भावना काही हिंदूंनी या वेळी व्यक्त केल्या.

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांची भेट घेऊन त्यांना ‘कृत्रिम हौदात कुणालाही श्री गणेशमूर्ती विसर्जनाला सक्ती करू नये’, असे सांगितले होते.
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
वाहनचालकांच्या जिवाशी खेळ खपवून घेणार नाही ! – महसूल राज्यमंत्री योगेश कदम
(म्हणे) ‘पीओपीच्या मूर्तींमुळे प्रदूषण होत असल्याने त्यावर बंदी आणावी !’
CM Dr. Mohan Yadav : प्रभु श्रीरामचंद्रांनी एक लग्न केले, तर रहिमकडूनही तीच अपेक्षा !