
ठाणे, ३० ऑगस्ट (वार्ता.) – कल्याण येथे श्री गणेशाच्या शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्यास मज्जाव करणार्या अधिकार्यास तांत्रिक गोष्टींविषयी प्रश्न विचारत हिंदुत्वनिष्ठ श्री. विजय ठाकरे यांनी गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात, खाडीपात्रात विसर्जन केले. याचे चित्रीकरण सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाले आहे.
१. येथील दुर्गाडी किल्ला परिसरात खाडीकिनारी असलेल्या गणेश घाटावर हिंदुत्वनिष्ठ श्री. विजय ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय त्यांच्या घरातील दीड दिवसाच्या गणपतीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते. विसर्जनासाठी कृत्रिम हौद सिद्ध करण्यात आले होते. या हौदात विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात येत होते. श्री. ठाकरे यांची गणेशमूर्ती शाडूच्या मातीपासून बनवलेली असल्यामुळे ती पर्यावरणपूरक होती. त्यामुळे त्यांनी तिचे विसर्जन खाडीपात्रातील वहात्या पाण्यात करण्याची मागणी अधिकार्यांकडे केली.
२. अधिकार्यांनी शासनाकडून आलेली ‘स्टँडर्ड ऑपरेशन प्रोसिजर’ची (एस.ओ.पी.) प्रत दाखवली. यावर ठाकरे यांनी खाडी आणि नदी पात्रात मोठ्या प्रमाणावर दूषित पाणी प्रक्रिया न करता सोडले जात असल्याचे त्यांनी अधिकार्यांच्या लक्षात आणून दिले.
३. नागरिकांनी गणेशमूर्तीसाठी पूजलेले निर्माल्य कचर्याच्या गाडीतून गोळा केले जात असल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचेही त्यांनी अधिकार्यांना सांगितले.
४. गणेशमूर्तीपूरक असल्याने तिचे विसर्जन वहात्या पाण्यात करण्याची मागणी करत त्यांनी खाडीपात्रात विसर्जन केले.
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
राजापूर तालुक्यातील १०१ ग्रामपंचायतींमध्ये राबवणार ‘जलतारा योजना’
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई