बाराक्षार चिकित्सापद्धतीचा शोध वर्ष १८३२ मध्ये लागला. ही एक विशिष्ट उपचारपद्धत असून ती ‘लॉ ऑफ डेफिशियन्सी (उणिवांचा नियम)’ या तत्त्वावर आधारलेली आहे. प्रोफेसर मोलेशॉट (Moleschott) यांच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रियांची रचना आणि चेतनाशक्ती या त्यांमध्ये असलेल्या अजैविक पदार्थांच्या (Inorganic substances च्या) प्रमाणावर अवलंबून असतात. अजैविक पदार्थांच्या उणिवेमुळे पेशींचे कार्य सुसंवादितपणे चालत नाही आणि ते अजैविक पदार्थ योग्य प्रमाणामध्ये दिल्यानंतर पेशींचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे बाराक्षार पद्धतीप्रमाणे आवश्यक ते क्षार दिल्यानंतर रोग नैसर्गिकपणे बरा करण्याच्या शरिराच्या प्रक्रियेला चालना मिळते. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बाराक्षार औषधांचा इतिहास, बाराक्षार औषधे सिद्ध करण्याची पद्धत, औषधाची निवड, औषध देण्याची पद्धत, क्षार न्यून झाले असता निर्माण होणारी लक्षणे आणि बाराक्षार आणि बाह्योपचार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे दिला आहे.
(भाग ५)
लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/950542.html
१२. राशीप्रमाणे उपयुक्त बाराक्षार औषध
‘पाश्चात्त्य ज्योतिषशास्त्राप्रमाणे सूर्य ही राशी महत्त्वाची मानली जाते आणि सूर्य राशी ही व्यक्तीच्या जन्मदिनांकाप्रमाणे निश्चित केली जाते.
१२ अ. मेष : २१ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती
१. अग्नितत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : काली फॉस

१२ आ. वृषभ : २१ एप्रिल ते २१ मे या कालावधीमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती
१. पृथ्वीतत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : नेट्रम सल्फ
१२ इ. मिथुन : २१ मे ते २१ जून या कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती
१. आकाशतत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : काली मूर
१२ ई. कर्क : २१ जून ते २१ जुलै या कालावधीमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती
१. जलतत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : कल्केरिआ फ्लोअर
१२ उ. सिंह : २२ जुलै ते २३ ऑगस्ट या कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती
१. अग्नितत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : मॅग फॉस
१२ ऊ. कन्या : २३ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर या कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती
१. पृथ्वीतत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : काली सल्फ
१२ ए. तूळ : २३ सप्टेंबर ते २३ ऑक्टोबर या कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती
१. आकाशतत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : नेट्रम फॉस
१२ ऐ. वृश्चिक : २३ ऑक्टोबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती
१. आपतत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : कल्केरिआ सल्फ
१२ ओ. धनु : २२ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती
१. अग्नितत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : सिलिशिआ
१२ औ. मकर : २२ डिसेंबर ते २१ जानेवारी या कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती
१. पृथ्वीतत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : कल्केरिआ फॉस
१२ अं. कुंभ : २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती
१. आकाशतत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : नेट्रम मूर
१२ क. मीन : २० फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीमध्ये जन्मलेल्या व्यक्ती
१. आपतत्त्व
२. उपयुक्त बाराक्षार औषध : फेरम फॉस
प्रत्येक राशी शरिराच्या विशिष्ट भागाचे प्रतिनिधित्व करते. त्यामुळे त्या राशीशी संबंधित बाराक्षार औषध घेतले असता शरीर निरोगी रहाण्यास साहाय्य होते. आपल्या राशीनुसार उपयुक्त असलेले बाराक्षार औषध नियमित घेणे हितावह ठरते.
औषधाचे प्रमाण : ४ गोळ्या दिवसातून ३ वेळा ३० मि.लि. पाण्यात विरघळून घ्याव्यात.
टीप : वरील सर्व औषधे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.’
(समाप्त)
संकलक : होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (१.५.२०२५)

जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !