बाराक्षार चिकित्सा (Biochemic System of Medicine)

बाराक्षार चिकित्सापद्धतीचा शोध वर्ष १८३२ मध्ये लागला. ही एक विशिष्ट उपचारपद्धत असून ती ‘लॉ ऑफ डेफिशियन्सी (उणिवांचा नियम)’ या तत्त्वावर आधारलेली आहे. प्रोफेसर मोलेशॉट (Moleschott) यांच्या म्हणण्याप्रमाणे इंद्रियांची रचना आणि चेतनाशक्ती या त्यांमध्ये असलेल्या अजैविक पदार्थांच्या (Inorganic substances च्या) प्रमाणावर अवलंबून असतात. अजैविक पदार्थांच्या उणिवेमुळे पेशींचे कार्य सुसंवादितपणे चालत नाही आणि ते अजैविक पदार्थ योग्य प्रमाणामध्ये दिल्यानंतर पेशींचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे बाराक्षार पद्धतीप्रमाणे आवश्यक ते क्षार दिल्यानंतर रोग नैसर्गिकपणे बरा करण्याच्या शरिराच्या प्रक्रियेला चालना मिळते. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘बाराक्षार औषधांचा इतिहास, बाराक्षार औषधे सिद्ध करण्याची पद्धत, औषधाची निवड, औषध देण्याची पद्धत आणि क्षार न्यून झाले असता निर्माण होणारी लक्षणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे दिला आहे. 

(भाग ४)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा :  https://sanatanprabhat.org/marathi/950026.html

११. बाराक्षार आणि बाह्योपचार

११ अ. मुरमे

१. ३० मि.लि. गरम करून थंड केलेल्या पाण्यात ‘काली फॉस’ १x च्या ६ ते ७ गोळ्या विरघळवाव्यात आणि त्या पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.

२. मुरमांमध्ये पू झाला असेल, तर ‘कल्केरिआ सल्फ’ ६x च्या १५ ते २० गोळ्या गरम करून थंड केलेल्या ३० मि.लि. पाण्यात विरघळवाव्यात आणि त्या पाण्याने चेहरा स्वच्छ करावा.

११ आ. चावण्यामुळे झालेल्या जखमा : गरम करून थंड केलेल्या पाण्यात ‘नेट्रम मूर’ ३x च्या १० गोळ्यांची पेस्ट सिद्ध करून ती जखमेवर लावावी.

११ इ. जखमेतून रक्तस्राव होणे

होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता

१. गरम करून थंड केलेल्या पाण्यात ‘फेरम फॉस’ ३x च्या १० गोळ्यांची पेस्ट सिद्ध करून ती जखमेवर लावावी.

२. नाकातून रक्तस्राव होत असेल, तर ‘फेरम फॉस’ ६x च्या गोळ्यांची पूड करून ती तपकिरीप्रमाणे ओढावी. (टीप) असे केल्याने ती पूड नाकाच्या आतील बाजूला चिकटून रक्तस्राव थांबण्यास साहाय्य होते.

११ ई. गळू : गरम करून थंड केलेल्या पाण्यात ‘फेरम फॉस’ ३x च्या १० गोळ्यांची पेस्ट सिद्ध करून ती लावावी.

११ उ. भाजणे

१. भाजल्यानंतर लगेचच ‘फेरम फॉस’ ३x च्या १० गोळ्यांची पूड खोबरेल तेलात मिसळून पेस्ट सिद्ध करावी आणि ती लावावी.

२. भाजून जखमा झाल्या असतील, तर ‘कल्केरिआ सल्फ’ ६x ची पेस्ट सिद्ध करून ती लावावी.

३. भाजण्यामुळे गंभीर जखमा झाल्या असतील, तर ‘काली मूर’ ३x आणि ‘नेट्रम मूर’ ३x च्या गोळ्यांची पेस्ट करून ती लावावी.

११ ऊ. पाठदुखी : ‘फेरम फॉस’ ३x आणि ‘नेट्रम फॉस’ ६x च्या गोळ्यांची खोबरेल तेलात पेस्ट सिद्ध करून त्याने मसाज करावा.

११ ए. मूळव्याध : ‘कल्केरिआ फ्लोअर’ १x, ‘फेरम फॉस’ १x आणि ‘काली मूर ६x’ च्या गोळ्यांची पूड व्हॅसलिनमध्ये मिसळून मलम सिद्ध करावे आणि ते गुदद्वाराला आतून अन् बाहेरून रात्री लावावे.

११ ऐ. खरूज (Scabies)

१. ‘नेट्रम सल्फ’ ६x च्या गोळ्यांची पूड व्हॅसलिनमध्ये मिसळून मलम सिद्ध करावे आणि ते लावावे.

२. पू येत असेल, तर ‘काली सल्फ’ ६x चे मलम लावावे.

३. तीव्र आग होत असेल, तर ‘नेट्रम मूर’ ६x चे मलम लावावे.

११ ओ. मान कडक होणे : ‘फेरम फॉस’ ६x च्या गोळ्यांची पूड व्हॅसलिनमध्ये मिसळून मलम सिद्ध करावे आणि ते लावावे.

११ औ. दातदुखी 

१. ‘नर्व्ह पेन’(नसांचे दुखणे) असल्यास ‘मॅग फॉस’ ३x गरम पाण्यामध्ये मिसळून पेस्ट सिद्ध करावी आणि तिने दात घासावेत.

२. अक्कलदाढ येत असतांना होणार्‍या वेदना न्यून होण्यासाठी ‘सिलिशिआ’ ६x आणि ‘फेरम फॉस’ ६x ची पेस्ट करून ती लावावी.

३. पू येत असेल, तर ‘कल्केरिआ सल्फ’ ६x च्या गोळ्यांची पेस्ट करून ती लावावी.

टीप : १. दुखणार्‍या भागाला / जखमेला लावण्यासाठी पुरेशी पेस्ट बनवण्यासाठी आवश्यक तेवढ्या गोळ्या घ्याव्यात.

२. ( वरील औषधे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.)’

(क्रमशः)

संकलक : होमिओपॅथी वैद्य प्रवीण मेहता, पुणे (२८.४.२०२५)