‘एम्.आय.एम्.’च्या उमेदवाराकडूनच दुहेरी मतदार असल्याचा आरोप

अतिक अहमद खान

मुंबई – माझ्या मतदारसंघात प्रत्येक प्रभागात किमान २ ते ३ तीन सहस्र बनावट मतदार आहेत. जवळपास ५० टक्के मतदार हे उत्तर भारतातही मतदार आहेत आणि इथेही स्थलांतरित झालेल्यांनी मतदान केल्याचे असल्याचे आम्ही उघड केले होते. याविषयी विजयी उमेदवारांनी कधी तक्रारी केल्याचे ऐकिवात नाही, असा आरोप ‘एम्.आय.एम्.’ (‘ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुसलमीन’)चे अतिक अहमद खान यांनी केला आहे. वर्ष २०२४ मध्ये मानखुर्द येथील शिवाजीनगर या मतदारसंघात खान यांचा पराभव झाला होता. त्यांच्या विरोधात समाजवादी पक्षाचे अबू आझमी हे १२ सहस्र मतांनी निवडून आले.

मानखुर्द शिवाजीनगर, मालाड पूर्व आणि मुंब्रा कळवा या मतदारसंघांत किमान १० ते ३० सहस्र दुबार मतदार नोंदणी केल्याचा आरोप खान यांनी केला आहे. लोकसभा ते विधानसभा निवडणुकीदरम्यान ३० ते ५० सहस्र मतदारांची नोंदणी वाढल्याची माहिती तेथील पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दिली आहे. वर्ष २०२४ मध्ये मतदारसूची पडताळणीच्या वेळी ३२ सहस्र मतदारांची वाढ नोंदवण्यात आली.

संपादकीय भूमिका 

महाविकास आघाडीने जिंकलेल्या मतदारसंघातही दुबार मतदार नोंदणी झाल्याच्या तक्रारी प्रतिस्पर्धी उमेदवारांनी करणे ही ‘मतदार चोरी’ची खोटी आवई उठवून भारत आणि लोकशाहीविरोधी षड्यंत्र राबवणारे राहुल गांधी, काँग्रेस आणि लोकशाही आघाडी पक्षाचे नेते यांना चपराकच आहे !