
अयोध्या (उत्तरप्रदेश) – प्रदीर्घ काळ अयोध्या विकासापासून दूर राहिली. समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या सरकारांनी हनुमानगढी मंदिराच्या पायर्यांवर नमाजपठण घडवून आणण्याचे पाप केले. देहलीच्या जामा मशिदीत कधी कुणी हनुमानचालिसाचे पठण करू शकतो का ?, असा प्रश्न उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बिकापूर येथील एका कार्यक्रमात केला.
श्रीराम आणि श्री हनुमान यांच्या आशीर्वादामुळे सर्व कामे आपोआप होतात !
योगी आदित्यनाथ पुढे म्हणाले की, अयोध्या आज विकास, समृद्धी आणि वैभव यांकडे वाटचाल करत आहे. जर हेतू स्वच्छ असेल, तर विकास आपोआप होतो. प्रभु श्रीराम यांची कृपा आणि हनुमानजींचा आशीर्वाद असेल, तर अयोध्येची सर्व कामे आपोआपच होतात, हे आज अयोध्येत दिसून येत आहे.
२ नगर पंचायतींचे नाव पालटले
या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २ महत्त्वाच्या घोषणा केल्या. यात त्यांनी ‘खिरौनी सोहावल’ नगर पंचायतीचे नाव पालटून ‘माँ ज्वालादेवी नगर पंचायत’ आणि ‘भरतकुंड-भदरसा’ नगर पंचायतीचे नाव पालटून ‘भरत नगर भरतकुंड’ करण्याची घोषणा केली.
गुरुपौर्णिमेपूर्वीच जयपूर (राजस्थान) येथील साधकांनी अनुभवला गुरुपौर्णिमा सोहळा !
राज्यात आतंकवादविरोधी पथकाच्या १५० ठिकाणी धाडी
पश्चिम महाराष्ट्रातील दुधात आढळली २५ टक्के भेसळ !
कर्नाटकामध्ये शिक्षिकेने धमकी दिल्याने ८ वीतील विद्यार्थिनीने केली आत्महत्या
ग्राहक वाद निवारण आयोगाने ‘रिलायन्स रिटेल’ दुकानदाराला ठोठावला दंड
धारुहेरा (हरियाणा) येथे सनातन संस्थेच्या वतीने ‘संस्कृती संवर्धन प्रशिक्षण शिबिर’ पार पडले !