‘घुसखोरी आणि इस्लामी कट्टरतावाद आसामसाठी धोकादायक’ हा लेख लिहिल्याचे प्रकरण

गौहत्ती (आसाम) – पत्रकार कोंगकोन बोर्थाकुर यांनी आमासमधील घुसखोरीवर लेख लिहिला होता आणि ही घुसखोरी इस्लामी कट्टरतावादाशी संबंधित असल्याचे दाखवले होते. यानंतर एका मुसलमान संघटनेच्या नेत्याने या पत्रकाराच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट ( दाखल) केली; मात्र गौहत्ती उच्च न्यायालयाने ही तक्रार रहित केली. हे धार्मिक नाही, तर हीच खरी पत्रकारितेची भूमिका आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
HISTORIC: Gauhati HC rules journalism cannot be criminalised for exposing religious fundamentalism, militancy & demographic threats.
Raising concerns on illegal migrants & border security is duty, not hate.
Landmark verdict shielding reporters from false cases.
PC:… pic.twitter.com/SdCc7dqIUN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 19, 2025
१. ८ नोव्हेंबर २०१६ या दिवशी पत्रकार कोंगकोन बोर्थाकुर यांनी ‘दैनिक जन्मभूमी’ या वर्तमानपत्रात घुसखोरीविषयी लेख लिहिला होता. या लेखात शेजारील देशांतून आलेल्या घुसखोरांमुळे निर्माण होणारा लोकसंख्येचा धोका, धार्मिक कट्टरतावाद आणि त्याच्या आडून होणार्या आतंकवादी कारवायांचा उल्लेख केला होता.

२. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर ‘ऑल असम मुस्लिम स्टुडंट्स युनियन’चे अध्यक्ष फरीद इस्लाम हजारिका यांनी पत्रकाराच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीमध्ये दावा करण्यात आला होता की, या लेखामुळे धार्मिक सौहार्दता बिघडेल आणि विविध समुदायांमध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न झाला.
३. पत्रकाराने या तक्रारीच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यांचा लेख प्रत्यक्ष जमिनीवरील संशोधनावर आधारित असल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता.
४. गौहत्ती उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रांजल दास यांच्या खंडपिठाने पत्रकाराविरुद्ध प्रविष्ट झालेली तक्रार रहित करण्याचा आदेश दिला. न्यायालयाने म्हटले की, पत्रकारितेचा मूलभूत धर्म म्हणजे समाजाशी निगडित ज्वलंत प्रश्न उपस्थित करणे हा आहे.
व्याज ‘हराम’; पण लाभ हलाल ?
वारकरी संप्रदायातील घुसखोर ओळखा !
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक