शस्त्रास्त्र निर्मितीकडे लक्ष देण्याची स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सूचना !

सावरकर यांनी हिंदुस्थान सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. देशाची सत्ता काँग्रेसच्या हाती होती. काँग्रेसने सावरकरांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केले. सावरकरांनी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे होत्या….

कोणतेही राष्ट्र शस्त्रबळावरच विजयी ठरते. स्वतंत्र हिंदुस्थानकडे स्वतःचे शस्त्रबळ असले पाहिजे. अत्यंत आधुनिक शस्त्रांस्त्रांची निर्मिती आपल्या देशाने केली पाहिजे. शस्त्रांसाठी इतर देशांवर अवलंबून रहाणे, हे नेहेमीच घातक ठरते. त्या दृष्टीने हिंदुस्थानने विचार करावा आणि शस्त्रास्त्र निर्मिती करण्याकडे लक्ष केंद्रित करावे. आपल्याकडे अद्ययावत् अशी शस्त्रास्त्रे असणे नितांत आवश्यक आहे. जे राष्ट्र सदैव युद्धासाठी सिद्ध असते, अशा राष्ट्रावर युद्ध करण्याची वेळ येत नाही. आपल्या देशाकडे असलेले सैन्य हे ‘सुरक्षादल’ नसून ‘आक्रमकदल’ असले पाहिजे. जगातल्या कोणत्याही देशाच्या दबावाखाली राहून आपण राज्यकारभार करू लागलो, तर आपल्या स्वातंत्र्याला काही अर्थ रहाणार नाही. आपण स्वतंत्र आहोत, आपण सामर्थ्यवान झालेच पाहिजे. आपण सामर्थ्यवान आहोत, याची अनुभूती जगाला आली म्हणजे जगातला कोणताही देश आपल्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्नही करणार नाही. असा दबाव टाकण्याचा जर कोणत्याही देशाने प्रयत्न केला, तर तो दबाव धुडकावून लावण्याचे सामर्थ्य आपल्यात असले पाहिजे. तरच आपण जगात ताठ मानेने जगू आणि आपले स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व अबाधित राहील.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.७.२०२५)
देशाच्या सीमा बंद करण्याची वीर सावरकर यांची सूचना ऐकली नाही !
देशाच्या विभाजनानंतर सातत्याने पाकिस्तानशी आपल्याला संघर्ष करावा लागला. पुरेसे शस्त्रबळ नसतांनाही आपल्या वीर सैनिकांनी पाकिस्तानला पाणी पाजले. सरळ सरळ युद्ध करून आपला हेतू साध्य करता येत नाही, हे ओळखून पाकिस्तानने छुप्या युद्धाच्या द्वारे आपल्या देशातील शांतता-सुव्यवस्था कायम धोक्यात आणली. पाकिस्तानकडून होणारा उपद्रव आपण आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्यासपिठावर मांडू शकलो नाही. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या वेळच्या सरकारला ‘आपल्या सीमा ‘सील बंद’ करा !’ असा सल्ला दिला. त्यावर त्या वेळचे पंतप्रधान नेहरू म्हणाले, ‘‘आपण आपल्या सीमा अशा प्रकारे सीलबंद केल्या, तर आपल्या शेजारील देशांवर आपला विश्वास नाही, असा अर्थ होईल आणि आपले संबंध बिघडतील.’’
सावरकर म्हणाले, ‘‘आपण आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी बाहेर जातांना दरवाजा बंद करून त्याला कुलूप लावतो. त्या वेळी आपल्या शेजारी रहाणार्या माणसावर आपण अविश्वास दाखवला, असा अर्थ लावला जात नाही. आपण आपल्या दरवाजाला कुलूप लावले म्हणून आपल्या शेजारच्या व्यक्तीशी आपले संबंध बिघडले नाहीत.’’
काँग्रेसच्या काळात स्वत्व, स्वाभिमान, राष्ट्रवाद कस्पटासमान !
देशाची सत्ता सर्वाधिक काळ काँग्रेस पक्षाकडे राहिली. काँग्रेसच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान ताठ राहील, अशा घटना क्वचितच आढळतात. देशाचा इतिहास पूर्णपणे पालटून परकीय आक्रमकांच्या राजसत्तेला श्रेठत्व बहाल करणारा इतिहास शाळाशाळांमधून शिकवला गेला. आपली विजयाची स्मारके निर्माण करण्याऐवजी पराभवाची स्मारके जतन करण्यातच सहिष्णुता आहे, असा समज जनमानसात दृढ करण्यात आला. त्यामुळे स्वत्व, स्वाभिमान, राष्ट्रवादाला कस्पटासमान मानले गेले. देशात निर्माण झालेला पेचप्रसंग स्वबळावर, स्वसामर्थ्याच्या साहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपली समस्या युनोकडे घेऊन जाण्यातच धन्यता मानली. त्यामुळे विशाल हिंदुस्थान असूनही सामर्थ्यसंपन्न म्हणून आपण आपली प्रतिमा जागतिक स्तरावर निर्माण करण्यात यश संपादन केले नाही. याची खंत काँग्रेसच्या नेत्यांना वाटल्याचे जनतेला जाणवले नाही.
सत्य, अहिंसा आणि असहकार यांनी देश स्वतंत्र करता येत नाही !

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, रक्त सांडले. ब्रिटीश सरकारला आपल्या देशात राज्य करता येणे अशक्य करून सोडले. त्यांच्या शौर्याला येथोचित मान देण्याची बुद्धी, गांधी विचारांनी घेरलेल्या मंडळींना कधीही झाली नाही. सत्य, अहिंसा आणि असहकार या तत्त्वत्रयींनी जगातला कोणताही देश स्वतंत्र करता येत नाही. तरीसुद्धा या बलहीन, दुर्बळ आणि शस्त्राविषयी घृणा निर्माण करणार्या कुचकामी तत्त्वत्रयींना कवटाळून बसलेल्या आपल्याच बांधवांना ‘रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळेना ।’ हा वैश्विक आणि शाश्वत सिद्धांत कधीही पटला नाही. परिणामी शत्रू कोण आणि मित्र कोण ? याची पारख करण्याची व्यावहारिक सारासार विचारशक्तीसुद्धा राहिली नाही. त्यांनी राष्ट्रहिताला प्राधान्य देण्यात कुचराई केली. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार्या शिवरायांना ‘वाट चुकलेला देशभक्त आणि लुटारू’ संबोधून ‘महात्मा’ आणि ‘पंडित’ म्हणून मिरवणार्यांनी ४ इस्लामी सत्तांना पायाखाली दाबून हिंदवी स्वराज्य निर्माण करणार्या शिवरायांकडे पाठ फिरवली. परिणामी आपण देश स्वतंत्र करण्यापूर्वीच एका शत्रू राष्ट्राला जन्म दिला. देश स्वतंत्र झाल्यावर आपल्या देशाच्या सीमा निश्चित करून त्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लागणारी काळजी घेण्यात आली नाही. त्यामुळे पाकिस्तान आणि चीन या दोन देशांनी आपली एक लक्ष चौरस किलोमीटरहून अधिक भूमी स्वतःच्या कह्यात घेतली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाची छाप पडेल, आपल्या देशाचा ठसा उमटेल, या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा निर्णय आपल्या देशाने घेतला नाही.
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.७.२०२५)
काँग्रेसच्या दुर्लक्षामुळे फुटीरतावादाला मोकळे रान !

चीनच्या दादागिरी समोर आपण अक्षरशः लोटांगण घातले. ‘अरुणाचल प्रदेश चीनचा आहे’, असे सातत्याने चीन जगाला सांगत राहिला. चीनच्या वृत्तीला वेसण घालण्याच्या हेतूने काँग्रेसने स्वत:चा आक्षेप कधीही नोंदवला नाही. देशाच्या स्वातंत्र्याला आणि सार्वभौमत्वाला बाधा निर्माण करणार्या अनेक घटना देशात घडत असतांनाही त्या घटनांकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. परिणामी फुटीरतावादाला मोकळे रान मिळाले. स्वतंत्र असलेल्या हिंदुस्थानात पाकिस्तानच्या विजयाच्या घोषणा निनादू लागल्या. तिरंगा ध्वज राष्ट्राचा अभिमान आहे, त्याला पायदळी तुडवणे, तो जाळणे या घटना उजळ माथ्याने घडू लागल्या. ‘वन्दे मातरम्’ला विरोध करण्यात आला, ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा घोषणा देणार्यांना कोणत्याही प्रकारचा अटकाव घातला गेला नाही. आतंकवाद्यांवर वचक बसवण्यासाठी काँग्रेसच्या सरकारने काहीही केले नाही. परिणामी या आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यास समर्थ असलेल्या सैन्यदलावर मात्र आतंकवाद्यांना बिर्याणीची ताटे सन्मानाने देण्याची वेळ आली. देशात बनावट नोटांचा सुळसुळाट झाला.
काँग्रेसच्या काळात देशाचा कारभार देशाबाहेरील सत्तेकडे गेला !

सत्तेचा आपलाभ घेऊन काँग्रेसने राज्यघटनेची पायमल्ली करून ३७० आणि ‘३५ अ’ यांसारखी कलमे राज्यघटनेत समाविष्ट करून कश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा बहाल केला. केंद्र सरकारचे कोणत्याही प्रकारे काश्मीरवर नियंत्रण रहाणार नाही, याची सोय करण्यात आली. परिणामी काश्मीर हे आतंकवादी आणि घुसखोर यांसाठी हिंदुस्थानात शिरण्याचे प्रवेशद्वार ठरले. देशात बॉंबस्फोटांच्या मालिका चालू झाल्या, काश्मीरमधील हिंदूंना परागंदा होण्याची वेळ आली, संसदेवर आतंकवाद्यांनी आक्रमण केले, रक्तपाताच्या घटना वारंवार घडू लागल्या, मंदिरांवर आक्रमणे होऊ लागली, बनावट नोटांचा सुळसुळाट झाला, काँग्रेस सरकारने अधिकृतपणे देशाच्या साधनसंपत्तीवर मुसलमानांचा पहिला अधिकार आहे, असे घोषित केले, या आणि अशा राष्ट्राच्या हिताला घातक ठरणार्या घटनांची मालिका चालू राहिली. काँग्रेसच्या कार्यकाळात देशाचा राज्यकारभार देशाबाहेरच्या सत्तेकडे गेला होता, अशा प्रकारचा निष्कर्ष उदाहरणांसह अनिश शर्मा यांच्या ‘यू ट्यूब’ वरील ‘प्रारब्ध’ या चॅनलवर गौरव प्रधान यांनी त्यांच्या दीर्घ मुलाखतीत सांगितले आहे.
भारतात चांगले राजकारणी आणि विद्वान यांचे झालेले संशयास्पद मृत्यू !
लालबहादूर शास्त्री यांची हत्या करण्यात आली. वर्ष १९६८ पासून ते काँग्रेसची सत्ता या देशात होती, तोपर्यंतच्या म्हणजे वर्ष २०१४ पर्यंतच्या या कालखंडात घडलेल्या घातपाताच्या घटनांचा धावता आढावा…. संजय गांधी यांचा विमान अपघातात झालेला मृत्यू, माधवराव शिंदे निवडणूक प्रचारासाठी जात होते, त्या वेळी त्यांचा झालेला अपघाती मृत्यू, राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांची झालेली हत्या, राजेश पायलट काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होऊ पहात असतांनाच त्यांचा चारचाकीच्या अपघातात झालेला मृत्यू, ग्यानी झैलसिंह यांच्या चारचाकीला ट्रकने दिलेली धडक आणि त्यात त्यांचा झालेला मृत्यू, अरुणाचल प्रदेशचे त्या वेळचे मुख्यमंत्री खांडू यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात त्यांचा झालेला मृत्यू, जितेंद्र प्रसाद काँग्रेसचे अध्यक्ष होण्यासाठी प्रयत्न करत असतांना ‘ब्रेन हॅमरेज’ (मेंदूत होणारा रक्तस्राव) होऊन झालेला त्यांचा मृत्यू, सुनंदा पुष्कर यांचा झालेला संशयास्पद मृत्यू, होमी जहांगीर भाभा हिंदुस्थानची संरक्षण व्यवस्था बळकट करण्याच्या प्रयत्नात असतांनाच त्यांचा झालेला विमान अपघातातला मृत्यू, इस्रोचे संस्थापक विक्रम साराभाई यांचा झालेला अपघाती मृत्यू हे सारे संशयास्पद मृत्यू आहेत. हेतूत: या सर्वांची हत्या करण्यात आली, असे गौरव प्रधान यांनी या मुलाखतीत सांगितले आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात राज्यकारभाराची सूत्रे देशाबाहेर असल्याचा दावा गौरव प्रधान यांनी केला आहे.
मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करून देशाला स्वावलंबी केले !

अशा पार्श्वभूमीवर वर्ष २०१४ मध्ये काँग्रेसची सत्ता हिंदुस्तानच्या भूमीवर अस्तास गेली आणि नव्या दमाचे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेवर आले. त्यांच्यासमोर देशातल्या अनेकानेक समस्यांचे सर्वांत मोठे आव्हान होते. ते त्यांनी स्वीकारले आणि आपल्या स्वतंत्र शैलीने पण सावरकरांच्या विचारधारेला अनुसरून त्यांनी राज्यकारभारास आरंभ केला. काँग्रेसच्या कार्यकाळात सर्व गोष्टी आयात केल्या जात होत्या. मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा करून आयातीवर अवलंबून असलेल्या देशाला स्वावलंबी केले. देशातली ढासळत जाणारी अर्थव्यवस्था त्यांनी उर्जितावस्थेला आणली. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेला हिंदुस्थान आज जगात चौथ्या क्रमांकावर आहे.
अधम लोकांसाठी शस्त्राचारावाचून अन्य कोणताही पर्याय नसणे !
आपल्या देशाचे सामर्थ्य वाढवून जगात आपला प्रभाव, आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी शस्त्राचाराची आवश्यकता नसते. कारण युद्ध हा सर्वांत अखेरचा पर्याय आहे. कोणतीही समस्या परस्पर सामंजस्याने सोडवता येते. त्यासाठी मुत्सद्देगिरी, चातुर्य, व्यापार उद्यम, मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे असे अनेक मार्ग आहेत. ‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’, हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. असे असले तरी प्रत्येक वेळी या मार्गाने आपल्याला यश संपादन करता येतेच असे नाही. ही गोष्टसुद्धा लक्षात घेतली पाहिजे. याचे कारण असे की, वर सांगितलेले सर्व मार्ग हे सभ्य, सुसंस्कृत समाजासाठी खुले आहेत. कपटी, विश्वासघातकी, रानटी विचारांच्या अधम लोकांसाठी हे मार्ग उपयुक्त ठरत नाहीत. त्यांच्यासाठी शस्त्राचारावाचून अन्य कोणताही पर्याय नसतो.
आतंकवादाच्या विरोधात संघटित होण्यासाठी प्रयत्न हवेत !

मोदी यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यावर विविध देशांचे दौरे करून परस्परांना साहाय्य करत आपण आपला विकास साधायचा आहे, असा विश्वास जगात निर्माण केला, तसेच जगातला आतंकवाद समूळ नष्ट करण्यासाठी प्रत्येक देशाने परस्परांना साहाय्य केले पाहिजे. आतंकवाद केवळ हिंदुस्थानची समस्या नसून जगाची समस्या आहे. या आतंकवादामुळे शांतता, सुव्यवस्था यांना धोका निर्माण होतो, तसेच वित्तहानी, मनुष्यहानी सार्वजनिक संपत्तीची हानी होऊन सामाजिक स्वास्थ्यही बिघडून जाते. म्हणून प्रत्येक राष्ट्राने आतंकवादाच्या विरोधात संघटित होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन मोदी सातत्याने करत राहिले.
इस्लामी साम्राज्य स्थापन करण्याची मुसलमानांची मनीषा !

आपला देश आपण स्वतंत्र केला, तेव्हापासून सातत्याने आतंकवादाशी सामना करतो आहे. मुसलमान समाजाला आपल्या देशात इस्लामी साम्राज्य प्रस्थापित करायचे आहे, ही गोष्ट मुसलमानांनी लपवली नाही. त्यांच्या कृतीतून ते सातत्याने दाखवत आले आहेत. मुसलमान समाजाला त्यांचे ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्या देशात त्यांच्यासाठी अनुकूल वातावरण हेतूत: निर्माण करण्यात आले. मोदी यांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतल्यावर त्यांच्यासमोर हे सर्वांत मोठे आव्हान होते. मुसलमान समाजाची इस्लामी राष्ट्र स्थापन करण्याची मनीषा फलद्रूप होणार नाही, या दृष्टीने अत्यंत सावधगिरीने मोदी यांनी हालचाल करण्यास आरंभ केला.
प्रथम त्यांनी एक सहस्र आणि ५०० रुपयांची नोटबंदी केली. त्यामागे काळ्या पैशाला लगाम घालणे, भ्रष्टाचारावर मात करणे, आतंकवादी कारवायांना आळा घालणे, ‘कॅशलेस’ (पैशांची प्रत्यक्ष देवाण-घेवाण न करता म्हणजेच डिजिटल) व्यवहाराला प्रोत्साहन देणे, देशात जी समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली होती, तिला शह देणे अशी अनेक उद्दिष्टे साध्य करणे शक्य झाले. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोटबंदी केल्यामुळे पाकच्या ‘गजवा-ए-हिंद’ या स्वप्नावर पाणी टाकले गेले. (क्रमश:)
– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली. (२५.७.२०२५)

पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !
Bareilly UP Love Jihad : २ मुलांचा पिता असलेल्या अरबाज याच्याकडून हिंदु तरुणीचे लैंगिक शोषण
Hijab Exam : हिजाब घातल्यावरून परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थिनीला मिळणार अभियांत्रिकीसाठी प्रवेश !
Bijnor Hindu Woman Rape : बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे ‘बनावट’ डॉक्टर फैजान याने हिंदु महिलेवर केला बलात्कार : धर्मांतरासाठी टाकला दबाव
Shamli Conversion : कोट्यधीश हिंदूच्या मुलाच्या धर्मांतराच्या प्रकरणात मुसलमान महिला व्यायाम प्रशिक्षक आणि तिचे वडील यांना अटक