
वापरकर्त्याच्या भ्रमणभाषच्या संकेताच्या (सिग्नल) आधारे ‘तो कुठे आहे’ आणि त्याने पुरवलेल्या माहितीच्या आधारे ‘त्याला कुठे जायचे आहे’, हे या यंत्रणेला कळते. त्यानुसार ‘गूगल मॅप’वर प्रवासाचा मार्ग दिसतो. (‘गूगल मॅप’ ही कृत्रिम उपग्रहांद्वारे संचलित होणारी एक जी.पी.एस्. स्थानदर्शक प्रणाली आहे.) पुष्कळ वेळा ही यंत्रणा उत्तम काम करते; पण काही वेळा ती चुकीचे मार्ग दाखवते. यानुसार प्रवास करतांना चुकीच्या मार्गाने गेल्याने जीवघेणे अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. कित्येकदा जवळचे आणि सोपे रस्ते या प्रणालीला ठाऊक नसतात अन् ही प्रणाली लांबचे आणि अवघड रस्ते दाखवते. त्यामुळे ज्या ठिकाणी सोप्या मार्गाने जाणे शक्य असते, त्या ठिकाणी पुष्कळ मोठा वळसा घालून जावे लागते. यामागे ‘या यंत्रणेकडील अपर्याप्त वा अयोग्य माहितीसाठा (डेटाबेस), वापरकत्र्याच्या भ्रमणभाषसंचातील तांत्रिक त्रुटी आदी अनेक कारणे असू शकतात’, हे आपण समजून घेतो आणि सहजपणे स्वीकारतोही.

‘गूगल मॅप’चे नियमित वापरकर्ते थोडे सावध असतात. ते या यंत्रणेवर डोळे झाकून विसंबून रहात नाहीत. स्वतःच्या बुद्धीचा आणि अनुभवाचा वापर करून आवश्यक तेव्हा इतरांचे साहाय्यही घेऊन ही यंत्रणा अधिक चांगल्या प्रकारे कशी वापरायची, ते शिकतात. काही जण अभिप्राय नोंदवून या यंत्रणेत सुधारणाही सुचवतात. थोडक्यात ही यंत्रणा केवळ मार्गदर्शक आहे. स्वतःचा प्रवास सुकर होण्यासाठी त्याचे साहाय्य घ्यायचे असते; पण ‘प्रवासाचे संपूर्ण नियंत्रण त्याच्याकडे सोपवायचे नसते’, ही समज जवळजवळ सर्वच वापरकर्त्यांना असते; पण ‘या यंत्रणेलाच थोतांड ठरवणे, टीका करणे, हास्यास्पद बनवणे, तिचे अस्तित्वच नष्ट करण्याचे प्रयत्न करणे’, असे कुणीही करत नाही.
आता ‘गूगल मॅप’च्या जागी ‘ज्योतिषशास्त्र’ ठेवून पहा. ‘गूगल मॅप’च्या संदर्भात दाखवलेला समजूतदारपणा ज्योतिषशास्त्राच्या वाटेला का येत नाही ? मुळात ‘ज्योतिष’ हे शास्त्र आहे’, हेच अनेक विद्वानांना लक्षात येत नाही; कारण त्या दृष्टीने डोळसपणे अभ्यास केला जात नाही. अजूनही प्रमुख विद्यापिठांमध्ये ‘ज्योतिष’ हा विषय शिकवण्यास विरोध आहे. नियतकालिकांतील साप्ताहिक राशीभविष्य, ज्योतिष आधारित मनोरंजनाचे कार्यक्रम, पुरेसा अभ्यास नसतांना इतरांना मार्गदर्शन करणारे किंवा अपलाभ उठवणारे कथित ज्योतिषी आदींमुळे या प्राचीन भारतीय विद्येचे अवमूल्यन होत आहे. ते थांबावे आणि ‘या ज्ञानशाखेचा सुखकर जीवनासाठी विवेकपूर्ण वापर व्हावा’, हीच अपेक्षा !
– श्री. रूपेश लक्ष्मण रेडकर, नवीन पनवेल.
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘त्याग’ आणि कला !