
गळ्यात तुळशी माळ, गोपीचंदनादी मुद्रा, हातात भगवी पताका, उभे गंध कपाळी, हाती टाळ, वीणा, मृदंग.
कुंचे पताका झळकती । टाळ मृदंग वाजती ।
आनंदें प्रेमें गर्जती । भद्रजाती विठ्ठलाचें ।।
अर्थ : ज्यांच्या खांद्यावर भगव्या पताका झळकतात, टाळमृदंग वाजतात, असे ते पवित्र विठ्ठलाचे भक्त आनंदाने भगवन्नामाची गर्जना करतात.
असा संत श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग आहे. तसेच संत तुकारामही म्हणतात,
‘गोपीचंदनउटी तुळसीच्या माळा ।
हार मिरविती गळां ।
टाळ मृदंग घाईं पुष्पवर्षाव ।
अनुपम्य सुखसोंहळा रे ।।’
पंढरपुरात वारकर्यांचे चंद्रभागेत स्नान आणि विठ्ठल दर्शन हे २ महत्त्वाचे कार्यक्रम असतात.
(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, एप्रिल २०१७, सौ. मालतीबाई नवाथे ट्रस्ट यांच्या अनुमतीने)
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवणार्या महिलेला जामीन देतांना हिंदूंच्या भावनांचा अनादर करणारा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निवाडा !
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘त्याग’ आणि कला !