
१. गोकुळ अष्टमीच्या दिवशी पाळीव कुत्र्याला श्रीकृष्णाच्या वेशभूषेत दाखवणार्या महिलेच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद
‘३.९.२०२४ या दिवशी झालेल्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी रंजनी गौर या महिलेने तिच्या पाळीव कुत्र्याला मोरपीस वगैरे लावून श्रीकृष्णाच्या वेशात दाखवले. त्याविरोधात शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने होशियारपूर जिल्ह्यातील तलवारा पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिते’तील कलम २९८ नुसार गुन्हा नोंदवला. या कार्यकर्त्याच्या मते या महिलेने जन्माष्टमीच्या दिवशी तिच्या कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवले आणि त्याचे ‘व्हॉट्सॲप’वर ‘स्टेटस’ ठेवले. याद्वारे तिने जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत.
२. याचिकाकर्त्या महिलेचा पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात विचित्र युक्तीवाद
यानंतर रंजनी गौर या महिलेने पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात धाव घेतली अन् तिच्या विरुद्धचा फौजदारी खटला, तसेच गुन्हा रहित करण्याची मागणी केली. तेथे तिने अतिशय हास्यास्पद युक्तीवाद केला. ती म्हणाली, ‘माझे लग्न होऊन ७ वर्षे झाली आहेत. मला मुलगा नसल्याने मी त्यालाच माझे मूल समजते. त्यामुळे मी त्याला श्रीकृष्णाच्या रूपात सजवले.’

३. उच्च न्यायालयाकडून महिलेच्या विरोधातील फौजदारी गुन्हा रहित करतांना हिंदूंच्या जखमेवर मीठ चोळणारे संदर्भ
अ. या प्रकरणी उच्च न्यायालयाने महिलेच्या विरोधातील फौजदारी गुन्हा रहित केला, तसेच अनावश्यक टिपण्या केल्या. यासाठी त्यांनी भगवद्गीतेतील अध्याय ५ वा आणि १८ व्या श्लोकाचा संदर्भ दिला. ते म्हणाले,
‘विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गवि हस्तिनि ।
शुनि चैव श्वपाके च पण्डिता: समदर्शिन: ।।’,
असे लिहिले आहे. त्याचा अर्थ ‘ते ज्ञानी पुरुष विद्या आणि विनय यांनी युक्त असलेल्या ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा अन् चांडाळ या सर्वांनाच समदृष्टीने पहातात.’ त्यामुळे श्रीकृष्णच कुत्र्याला गोमातेच्या समवेत पहायला सांगतो. त्यामुळे कुत्र्याला श्रीकृष्णाच्या रूपात दाखवले, तर त्यात चूक काय आहे ? त्यानंतर न्यायमूर्ती म्हणतात, ‘जेव्हा स्वर्गात जायची वेळ आली, तेव्हा युधिष्ठिरासह केवळ कुत्रा होता. या सर्व गोष्टींचा स्पष्ट अर्थ असा आहे की, हिंदूंनी अशा लहान लहान गोष्टींवरून थेट फौजदारी खटला नोंदवण्यापर्यंत जाऊ नये.’ त्याही पुढे जाऊन न्यायमूर्ती म्हणाले की, ‘कुत्रा हे कालभैरवाचे रूप आहे, तसेच दत्तगुरूंच्या चित्रातही ४ कुत्रे दाखवले जातात.’
आ. न्यायमूर्ती म्हणाले, ‘उपनिषदातील ‘सर्वं खल्विदं…’ या श्लोकाप्रमाणे सर्व सत्य आणि ब्रह्म आहे. आद्यशंकराचार्यांनी वेदांत सांगितल्यासारखे देव आणि देवासारखे घटक आपल्या सर्व मानव जातीला एकत्रित ठेवत आहेत. श्रीकृष्णाला रंगनाथाच्या रूपात दाखवले जाते. तेही बाळकृष्णाच्या सगुण-निर्गुण या तत्त्वाप्रमाणे आहे. या घटनेत याचिकाकर्त्या महिलेचा भाव हा हिंदूंच्या भावना दुखवायचा नव्हता. श्रीकृष्ण म्हणतो की, प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूंमध्येही मी आहे. मग कुत्र्यात देव न पहाणे चुकीचे आहे.’
इ. या न्यायमूर्तींनी त्यांच्या निकालपत्रात काही इजिप्शियन पंथ आणि जपानी लोक यांच्या उपासनापद्धतीचे संदर्भ दिले. त्यानंतर न्यायमूर्ती म्हणतात की, दशावतारात श्रीविष्णूला मासा, कासव, वराह, नरसिंह इत्यादी स्वरूपांमध्ये दाखवलेले आहे.
ई. त्याही पुढे जाऊन गोस्वामी तुलसीदास द्वारा रचित ‘रामचरितमानस’मधील ‘जाकी रही भावना जैसी, प्रभु मूरत देखी तिन तैसी’, हा श्लोक न्यायमूर्तींनी निकालपत्रात सांगितला आणि प्रत्येक रूपात ईश्वरी अंश आहे, असे सांगितले. त्यामुळे याचिकाकर्त्या महिलेविरुद्धचा फौजदारी गुन्हा रहित करण्यास हरकत नाही.

४. नाशिक येथील ‘टी.सी.एस्.’ प्रकरणातील निदा खान हिला जामीन देतांना न्यायाधिशांकडून भगवान श्रीकृष्णाचा संदर्भ
नाशिक येथील ‘टी.सी.एस्.’च्या प्रकरणातील निदा खान हिला जामीन देतांनाही न्यायाधिशांनी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी असलेल्या कारागृहाचे वर्णन केले. श्रीकृष्णाचा मामा कंसाने वसुदेव आणि देवकी यांना कारागृहात बंदी केले होते, असे म्हटले. हिंदु महिलांचे धर्मांतर करायला निघालेल्या आतंकवादी वृत्तीच्या निदा खान हिला जामीन संमत करण्यासाठी अशा प्रकारे हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळणारे संदर्भ देणे चुकीचे आहे.
५. न्यायव्यवस्थेकडून हिंदूंना गृहीत धरण्याचे प्रयत्न
याचिकाकर्त्या महिलेला हिंदूंच्या धार्मिक भावना दुखवायच्या होत्या का ?, त्यांचा हेतू शुद्ध होता का ?, हा विषय साक्षी-पुराव्यांचा आणि सुनावणीचा आहे. बहुतेकदा न्यायव्यवस्था धर्मांध किंवा अल्पसंख्यांक यांच्या भावना चांगल्या पद्धतीने जपते, असे अनेक वेळा दिसून आले आहे. या प्रकरणात याचिकाकर्त्या महिलेल्या भूमिकेत जाऊन न्यायमूर्तीच म्हणतात, ‘कुत्र्याला श्रीकृष्णाच्या वेशात दाखवण्यास हरकत नाही.’ अशा वेळी न्यायसंस्थेने बहुसंख्य हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर केला पाहिजे, असे वाटते. संपूर्ण निकालपत्रात त्या महिलेने हिंदूंच्या भावना दुखावण्याविषयी साधी दिलगिरीही व्यक्त केलेली नाही. या महिलेने अन्य पंथियांच्या सणाच्या वेळेस असे काही ‘व्हॉट्सॲप स्टेट्स’ ठेवण्याचे धाडस केले असते का ? आणि तसे केले असते, तर न्यायालयात याचिका करण्याची वेळ आली असती का ? आणि मग न्यायालयानेही असे अन्य पंथियांच्या भावनांचा अनादर करणारे निकालपत्र दिले असते का ?, याचाही विचार होणे आवश्यक आहे.’
श्रीकृष्णार्पणमस्तु ।
– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय (१४.७.२०२६)
‘गूगल मॅप’ आणि ज्योतिषशास्त्र
वारकरी संप्रदायाची वेशभूषा
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
तुका आकाशाएवढा…
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
गुरुकृपायोगानुसार साधनेअंतर्गत ‘त्याग’ आणि कला !