काश्मिरी हिंदु सरला भट्ट हत्या प्रकरणात ३५ वर्षांनंतर कारवाई !

श्रीनगर – वर्ष १९९० मध्ये काश्मिरी हिंदु महिला सरला भट्ट यांच्या करण्यात आलेल्या हत्येच्या प्रकरणात विशेष अन्वेषण संस्थेने १२ ऑगस्टला श्रीनगरमधील ८ ठिकाणी धाडी घातल्या. ‘जम्मू-कश्मीर लिबरेशन फ्रंट’ या संघटनेचा प्रमुख यासीन मलिक याच्या मैसुमा भागात असलेल्या घरासह त्याच्या सहकार्यांच्या लपण्याच्या ठिकाणांवरही धाडी घालण्यात आल्या. जिहादी आतंकवाद्यांनी १९९० च्या दशकात काश्मिरी हिंदूंच्या केलेल्या वंशविच्छेदाच्या प्रकरणी जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपालांनी या हत्याकांडाचे खटले पुन्हा चालू करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. या निर्णयानुसार अन्वेषण संस्थेने ही कारवाई चालू केली आहे.
🛑 Sarla Bhatt Murder Case – Action After 35 Years!
Kashmiri Hindu Sarla Bhatt was subjected to rape, torture, and a brutal killing.
Now, after 35 yrs, police raid 8 Srinagar locations, incl. Yasin Malik’s house.
How will they find evidence now?
Tomorrow they’ll claim “no… pic.twitter.com/4mSVzwewnj
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) August 12, 2025
सरला भट्ट यांची निर्घृणपणे केली होती हत्या !

परिचारिका म्हणून काम करणार्या सरला भट्ट यांचे ‘शेर-ए-कश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’च्या वसतीगृहातून वर्ष १९९० मध्ये अपहरण करण्यात आले होते. दुसर्या दिवशी श्रीनगरमधील सौरा भागात गोळ्यांनी चाळणी केलेला त्यांचा मृतदेह सापडला. हा खटला आरंभी निगीन पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला होता. नंतर तो विशेष अन्वेषण संस्थेकडे वर्ग करण्यात आला.
संपादकीय भूमिका
|
Shivakumar As Lord Shiva : कन्नड दैनिक ‘विश्ववाणी’ने डी.के. शिवकुमार यांना भगवान शिवाच्या रूपात दाखवले !
नागपूर येथे वाठोडा पोलीस ठाण्यातील लाचखोर महिला उपनिरीक्षक कह्यात !
BJP Leader Murder : जयपूरमध्ये भाजपच्या नेत्याची शिरच्छेद करून निर्घृण हत्या
Britain Grooming Gangs : खासदाराने ब्रिटीश संसदेत उपस्थित केले ‘ग्रूमिंग टोळी’चे सूत्र
Delhi Usmanpur Murder : देहलीमध्ये १७ वर्षांच्या हिंदु मुलाची पूर्व वैमनस्यातून हत्या
Constable Suspended : फुकट पाणीपुरी आणि आईस्क्रीम खाणारा हवालदार निलंबित !