हिंदु राष्ट्र समन्वय समितीची निवेदनाद्वारे मागणी !

अकोला – मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात निर्दोष सुटलेल्या हिंदुत्वनिष्ठांविषयी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हिंदुविरोधी वक्तव्ये केली. याच्या निषेधार्थ हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या वतीने खदान पोलीस ठाणे आणि अकोला जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश करंदीकर यांनी निवेदन स्वीकारून ‘संबंधित विभागाकडून योग्य अन्वेषण केले जाईल’, असे सांगितले.
निवेदन देण्यासाठी शहरातील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, अधिवक्ता, उद्योजक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांच्या वतीने नायब तहसीलदार लीला काकड यांनी निवेदन स्वीकारले.
या प्रसंगी ‘राष्ट्रभक्त अधिवक्ता समिती’चे सर्व अधिवक्ते दीपाली जानोरकर, राधा मिश्रा, लक्ष्मी दांदळे, सुनीता कपिले, मंजू सावरकर, रामदास कपिले, अभिमन्यू नळकांडे, मुक्तेश्वर पांडे, श्रुति भट उपस्थित होत्या, तसेच धर्माभिमानी सर्वश्री संजय केंदळे, शंकर कडू, नीरज मिश्रा, डॉ. अशोक ओळंबे, संजय ठाकूर, रवींद्र फाटे, राहुल मौर्य, सोनू कदम, प्रमोद अग्निहोत्री, हरिओम पांडे, राजीव इंगळे, दीपक पुरी, राजू मंजुळकर, सहसंयोजक योगेश अग्रवाल, संजय ठाकूर, नंदकिशोर मेहरे उपस्थित होते.
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !
‘पॉक्सो’अंतर्गत अटक केलेल्या आरोपींवर कठोर कारवाई आणि विकृत वाहकाला बडतर्फ करा !
Waqf Board Scam : समाजवादी पक्षाच्या सत्ताकाळात ‘वक्फ बोर्डा’च्या भूमींमध्ये अब्जावधी रुपयांचा घोटाळा ! – मौलाना शहाबुद्दीन रिझवी बरेलवी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !
मुंबईवरील २६/११ चे आक्रमण काँग्रेस आणि आय.एस्.आय. यांनी एकत्र घडवून आणले ! – R.V.S. Mani
युवती आणि महिला यांच्या सुरक्षेसाठी ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ तात्काळ लागू करावा !