महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मंडणगड तालुका मंदिर-न्यास अधिवेशन

मंडणगड, ११ ऑगस्ट (वार्ता.) – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंडणगड येथील तालुकास्तरीय मंदिर-न्यास अधिवेशनाला तालुक्यातील १२० मंदिर विश्वस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी संघटित होण्याचा निर्धार मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केला. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, सामूहिक आरती करणे आदी विविध उपक्रम मंदिरांमधून चालू करण्यासह मंदिर विश्वस्तांच्या संघटनासाठी वेळ देणार असल्याचेही मत उपस्थित मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केले. १० ऑगस्ट या दिवशी लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात आयोजित मंडणगड मंदिर विश्वस्त अधिवेशन प्रेरणादायी आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले.
मंडणगड तालुका मंदिर-न्यास अधिवेशनात मान्यवरांनी मांडलेले विचार !
देवस्थानांच्या देवराई भूमी वाचवण्यासाठी संघटितपणे लढा देणे आवश्यक ! – संजय जोशी, राज्य संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती तोडल्या. त्यानंतर आलेल्या इंग्रजांनी हिंदूंच्या मंदिरांच्या जागा कह्यात घेणे, मंदिरांचा पैसा हडपणे, असे आघात केले. भारतात निधर्मी राज्यकर्त्यांनीही देशभरातील साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांचा पैसा अन्य पंथीयांना वाटण्याचे चालू केले. सरकारीकरण झालेल्या शनि मंदिरात केक कापण्याची कुप्रथा मंदिर महासंघाच्या विरोधानंतर बंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर देवराई भूमींच्या सात-बारा वरून देवस्थानांचे नाव काढून तेथे शासनाचे नाव लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भूमी देवस्थानांच्या कह्यात दिल्या जाव्यात, यासाठी मंदिर महासंघ प्रयत्नरत आहे. यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ (भूमी बळकावणे विरोधी कायदा) महाराष्ट्र शासनाने लागू करावा, यासाठी मंदिर महासंघ पाठपुरावा करत आहे.
मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरे ही हिंदूंसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी चैतन्याचे स्रोत आहेत. समाजाची सात्त्विकता टिकून ठेवण्यामध्ये मंदिरांचे योगदान महत्त्वाचे आहे. समाजात वाढलेला भ्रष्टाचार, घसरलेली नीतीमत्ता हा समाजात न्यून झालेल्या सात्त्विकतेचा गंभीर परिणाम आहे. मंदिरे ही समाजाला धर्माविषयी दिशा देणारी केंद्रे बनल्यास ती खर्या अर्थाने समाजाची श्रद्धाकेंद्रे बनू शकतात. यासाठी मंदिरामध्ये नियमित धर्मिशक्षणवर्ग चालू करणे आवश्यक आहे. या वर्गातील शिकवणुकीमुळे समाज धर्माचरणी आणि सात्त्विक बनेल.
मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करणे आवश्यक ! – डॉ. ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, जिल्हा संयोजक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, विश्वस्त भगवान परशुराम देवस्थान.

मंदिरांचे पावित्र्य राखण्याचा एक भाग म्हणून मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करणे आवश्यक आहे. मंदिरा सभोवतालची जागा देवरहाटीमध्ये कोणत्याही सुविधा निर्माण करायच्या असतील, तर शासकीय अडचणी येतात. देवरहाटीमध्ये देवाचे अस्तित्व आपण मानत असल्याने, तेथील पावित्र्य आपण जपतो, मग यावर सरकारचे नाव का ? याविषयी आपल्याला कायदेशीर लढाही द्यावा लागेल.
मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे महत्त्वाचे ! – रमेश कडू, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दापोली संयोजक

हिंदूंसमोर अनेक समस्या आहेत, त्याचे मूळ कारण धर्मशिक्षणाचा अभाव आहे. हिंदु अधिवेशनातून आम्हाला प्रेरणा मिळाली. धर्मशिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्याने आम्ही मंदिरातून धर्मशिक्षणवर्ग चालू केले, धर्मशास्त्र आणि साधनेचे महत्त्व धर्मशिक्षणवर्गातून लक्षात आले. धर्म जागृत ठेवायचा असेल, तर मंदिरांची भूमिका महत्त्वाची आहे. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.
हिंदु धर्मासाठी मंदिर विश्वस्तांनी एकवटले पाहिजे ! – संतोष चव्हाण, सचिव, श्री भैरी-जोगेश्वरी देवस्थान, मंडणगड

या अधिवेशनात ‘विश्वस्तांच्या रूपात सर्व देवता एकवटलेल्या आहेत !’, असे जाणवत आहे. मंदिरांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्याचे निराकरण करणे, हे महासंघाचे चांगले कार्य चालू आहे, आपल्या तालुक्याने या अभियानात चांगला सहभाग घेतला आहे. गोप-गोपींनी जसे गोवर्धन पर्वताला स्वतःच्या काठ्या लावल्या, तसे आपण संघटितपणे हिंदु धर्माचे कार्य करायचे आहे, संघटनामध्ये शक्ती आहे. हिंदु धर्मासाठी मंदिर विश्वस्तांनी एकवटले पाहिजे.
मान्यवरांचे सत्कार१. ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे यांचा महासंघाचे रत्नागिरी जिल्हा कोअर कमिटी सदस्य श्री. लक्ष्मण गुरव यांनी केला. २. महासंघाचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. संजय जोशी यांचा सत्कार श्री साळुबाई देवस्थान, मुगीजचे अध्यक्ष श्री. उदय गुजर यांनी केला. ३. श्री भैरी जोगेश्वरी देवस्थान, मंडणगडचे सचिव श्री. संतोष चव्हाण यांचा सत्कार समितीचे श्री. चंद्रकांत उजाळ यांनी केला. ४. महासंघाचे संयोजक श्री. रमेश कडू यांचा सत्कार भैरी भवानी देवस्थान, लाटवणचे सचिव श्री. किशोर कदम यांनी केला. ५. समितीचे श्री. विनय पानवळकर यांचा सत्कार भैरी-जानाई देवस्थान, भोळवलीचे ह.भ.प. विजय महाराज माने यांनी केला. ![]() अनुभव कथन१. डॉ. सुहास पवार, देव्हारे : अधिवेशनाच्या निमित्ताने केलेल्या प्रसारात आम्हाला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ग्रामीण भागांत ख्रिस्त्यांकडून मोठ्या प्रमाणात धर्मांतर केले जात आहे. आपल्याला मोठे कार्य करावे लागेल. आपण संघटित राहिलो, तरच धर्माचे रक्षण करू शकतो. २. श्री. सुनील जाधव, बाणकोट : आमच्या देवस्थानाची जागा अन्य धर्मियांच्या नावावर आहे. आमच्या भागात मंदिर बांधण्याला त्यांचा विरोध होतो. ‘हिंदूंचे देव धोंडे आहेत’, असे त्यांच्याकडून बोलले जाते. अशा समस्यांच्या संदर्भात आम्ही संघर्ष करत आहोत. |
मनोगत
१. श्री. अनंत शिंदेगुरुजी, टाकेडे : अधिवेशनातून ऊर्जा मिळाली. या धर्मकार्यात सहभागी होऊया. अन्य धर्मीय गोड बोलून आपल्या विरोधात षड्यंत्र रचतात, मंदिरातून धर्माचे शिक्षण देण्याचे वर्ग व्हायला हवेत.
२. श्री. रमेश शिंदे, सुरले : मंदिर-न्यास जो कार्यक्रम राबवत आहे, तो वाखणण्यासारखा आहे. वस्त्रसंहिता मंदिरात लावण्याचा विषय महत्त्वाचा आहे.
३. ह.भ.प. सखाराम माळी, पाले कोंड : हिंदु मुली अन्य धर्मीयांच्या फसव्या प्रेमाला बळी पडतात. आपली मुले ‘मम्मी’, ‘डॅडी’ म्हणतात. अशामुळे धर्म संपत आहे. आपल्या मुलांना धर्माचे शिक्षण द्यायला हवे.
४. श्री. राजेश पारेख, मंडणगड : अधिवेशनातील विचारांनी मी आज हिंदु आहे याची जागृती झाली, ही जागृती मंडणगड तालुक्यात व्हावी. या कार्यासाठी मी सहकार्य करीन. आज एकत्र येणे आवश्यक आहे
५. ह.भ.प. दगडू बैकर, शेनाळे : सचिव, मंडणगड तालुका वारकरी संप्रदाय – मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहिता उपक्रम राबवणे महत्त्वाचे आहे. मंदिर महासंघ हिंदुत्वाची जाणीव करून देतोय. धर्म टिकवण्यासाठी लागेल ते कष्ट करायला तयार आहोत.
६. संतोष राणे, भोळवली : देवस्थानांच्या भूमीसंदर्भात आपण करत असलेले कार्य आवश्यक आहे, या उपक्रमात आम्ही सहकार्य करू.
विशेष :मंदिर महासंघाच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांनी मंडणगड तालुक्यातील ६५ हून अधिक गावात मंदिर विश्वस्तांच्या भेटी घेतल्या. या नियोजनात मंदिर महासंघाचे रत्नागिरी जिल्हा संघटक श्री. सुरेश शिंदे, श्री. रमेश कडू, समितीचे दापोली समन्वयक श्री. परेश गुजराथी, श्री चंद्रकांत उजाळ आणि मंडणगड येथील श्री. शंकर जंगम यांनी सहभाग घेतला. |
विश्वस्तांनी अभिप्रायातून व्यक्त केला कृतीशील सहभाग !
१. श्री. सुधाकर घोसाळकर, पाचरल : कार्यक्रमातून प्रेरणा मिळाली आहे. मी या कार्यात सर्वतोपरी सहभाग घेऊन प्रसार करीन.
२. श्री. दिलीप महादेव रक्ते, टाकवली : मी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या कार्यात सहभागी होईन.
३. श्री. विनय महाडिक, शेवरे : अधिवेशनात सांगितल्याप्रमाणे गावातील मंदिरांमध्ये हिंदु धर्मशास्त्रानुसार धार्मिक कृती करण्याचा प्रयत्न करू.
४. श्री. किशोर कदम गुरुजी, लाटवण : अधिवेशनातून आमच्या कर्तव्याची आणि योगदानाची जाणीव झाली.
५. ह.भ.प. अनंत पवार, वलौते : आपल्या मंदिरांचे रक्षण करणे आपले काम आहे. महासंघाच्या विचाराशी आम्ही सहमत आहोत.
६. ह.भ.प. चंद्रकांत जगताप, सडे : वारकरी मंडळींना एकत्र करण्याचे कार्य केलेले आहे. पुढील अधिवेशन आमच्या मंदिरात घेऊ.
७. श्री. महेंद्र सुंदर सावंत, दहागाव : आजच्या अधिवेशनातून हिंदुत्व आणि देवस्थाने यांची जागृतीकरण केल्याचा आनंद झाला.
८. श्री. अनंत लाखण, भिंगळोली : वस्त्रसंहिता आणि मंदिरातून धर्मशिक्षण यांची आवश्यकता लक्षात आली.
९. श्री. विजय ऐनेकर, निगडी; श्री. रमेश बाईत, माहू; श्री. राजेश दिवेकर, भिंगळोली : हिंदु धर्म आणि मंदिरे रक्षणार्थ प्रयत्न स्वागतार्ह आहेत, ही काळाची आवश्यकता आहे.
१०. श्री. आशिष लक्ष्मण घोसाळकर, घोसाळे : मंदिरांमध्ये धर्मजागृतीपर व्याख्याने आम्ही ठेवू.

‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
श्री विठ्ठलमूर्ती संवर्धनासाठी रासायनिक लेपनाला विरोधच; धर्मशास्त्रानुसार लेपन करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघ
अधिवक्ता नागवेकर यांची ‘स्विगी’ला कायदेशीर नोटीस
सौंदळ (राजापूर) येथे आढळले अश्मयुगीन कातळशिल्प
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती