|

मुंबई – आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी अरविंद सावंत यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना १० ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २००८ पर्यंत अवैधरित्या पथकाच्या कोठडीत ठेवले. ‘सरसंघचालक मोहन भागवत, नरेंद्र मोदी, इंद्रेश कुमार आणि योगी आदित्यनाथ यांच्या सांगण्यावरून बाँबस्फोट घडवला’, हे त्यांच्या तोंडून वदवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चामड्याच्या पट्ट्याने त्यांना अमानुष मारहाण केली जात होती. अगदी विवस्त्र करूनही मारहाण करण्यात आली. ‘भगवा आतंकवाद’ सिद्ध करण्यासाठी हे सर्व चालू होते. त्यांना आळीपाळीने मारणार्यांमध्ये एका महिला पोलीस अधिकार्यासह आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख हेमंत करकरे, परमबीर सिंह आणि इतर पुरुष पोलीस अधिकार्यांचाही समावेश होता, अशी धक्कादायक माहिती मालेगाव बाँबस्फोटाच्या प्रकरणात निर्दाेष सुटलेल्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचे अधिवक्ता जयप्रकाश मिश्रा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीतून उघड झाली आहे.
ते म्हणाले,
१. अटकेनंतरच्या काळात केलेल्या अमानुष मारहाणीमुळे साध्वींची स्थिती गंभीर झाली होती. त्यांना आधी दादरच्या शुश्रुषा आणि नंतर वझे रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथून सोडल्यावर सत्यवदनासाठी ‘नार्कोटेस्ट’, ‘ब्रेन मॅपिंग टेस्ट’, ‘पॉलिग्राफी’, ‘सायकोलॉजिकल टेस्ट’ अशा विविध चाचण्या एकदा न्यायालयाच्या अनुमतीने, तर दोनदा अवैधरित्या करण्यात आल्या. इतके करूनही साध्वींच्या विरोधात पुरावा न मिळाल्याने पथकाने ते अहवाल न्यायालयात सादरच केले नाहीत.
२. तत्कालीन काँग्रेस सरकारने मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात निष्पाप हिंदूंना फसवण्याचे महाभयंकर पाप केले. वर्ष २००८ च्या कालावधीत जेथे बाँबस्फोट होत, तेथे विशिष्ट धर्माचे लोकच आरोपी म्हणून पकडले जात होते. वर्ष २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशिष्ट धर्माच्या लोकांना खुश करण्यासाठी खोटे षड्यंत्र रचून हिंदूंना पकडण्यात आले. सरकारला दाखवायचे होते की, हिंदूही आतंकवादी आहेत. त्यानंतर जयपूरच्या अधिवेशनापासून काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, दिग्विजय सिंह, पी. चिदंबरम् आणि काँग्रेसचे इतर नेते यांनी ‘भगवा आतंकवाद’ हे सूत्र रेटायला प्रारंभ केला.
संपादकीय भूमिका
|
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक