|
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – पुलवामा जिल्ह्यात असलेल्या लोसवानी गावात रहात असलेले रैना हे एकमेव हिंदु कुटुंब आहे. शेजारीच रहाणार्या एका मुसलमान कुटुंबाने त्यांना फसवले. त्या कुटुंबातील सज्जाद मीर नावाच्या तरुणाने निहा रैना या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले, तिचे धर्मांतर केले आणि नंतर तिच्याशी निकाह (इस्लाम पद्धतीनुसार विवाह) केला. विशेष म्हणजे सज्जादने विवाहाच्या ५ दिवस आधीच अन्य एका मुसलमान मुलीशी निकाह केला होता. या प्रकरणी हिंदु कुटुंबाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. अजूनही सज्जादला अटक झालेली नाही. या प्रकरणी १ ऑगस्टला जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात सुनावणी झाली.
संपूर्ण घटनाक्रम असा !
१. वर्ष १९९० मध्ये जेव्हा लाखो हिंदु कुटुंबे काश्मीरमधून पलायन करत होते, तेव्हा लोसवानी गावातील मुसलमानांनी रैना कुटुंबाला ‘काश्मिरीयत (काश्मिरातील हिंदु-मुसलमान बंधुत्व) तुम्हाला सुरक्षित ठेवेल’, असे सांगून थांबवून घेतले. रैना यांनी त्यावर अंधविश्वास ठेवला.
२. शेजारील मुसलमान कुटुंबातील सज्जाद मीर स्वत:ला निहा हिचा भाऊ म्हणवून घेत असे; परंतु या मुसलमान कुटुंबानेच ३५ वर्षांनी रैना यांच्या पाठीत खंजीर खुपसला.
३. सज्जादने निहाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. घरच्यांच्या विरोधात तिला भडकावले आणि तिचे धर्मांतर करून तिला तिच्या कुटुंबापासून तोडले.
४. ११ मे २०२५ या दिवशी त्याने एका मुसलमान मुलीशी निकाह केला आणि लगेच १६ मे या दिवशीच निहा हिच्याशी निकाह केला. या विवाहाची कोणती कायदेशीर नोंद करण्यात आली नाही, तसेच तिच्या पालकांची अनुमती घेण्यात आली नाही.
५. या प्रकरणी रैना कुटुंबाने पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी केली असता एक व्हिडिओ हाती लागला. यात निहाचे बलपूर्वक धर्मांतर होतांना दिसत आहे; परंतु त्यात ती म्हणत आहे की, ‘मी स्वेच्छेने इस्लाम स्वीकारत आहे.’ हा व्हिडिओ न्यायालयात सादर झाला. हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्याने पोलीस प्रशासनाच्या कामाविषयी प्रश्न निर्माण झाले आहेत.
६. या प्रकरणी श्रीराम सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक, तसेच यति मां चेतनानंद सरस्वती यांनी निषेध करत निहाला परत आणण्यासह काश्मीरमधील हिंदूंचे रक्षण होण्यासाठी तेथे एक सुरक्षा दल नेमण्यात यावे, अशा मागण्या केल्या.
काश्मिरी हिंदु महिलांचे ‘लव्ह जिहाद’पासून रक्षण करा ! – पनून कश्मीरया प्रकरणी ‘यूथ फॉर पनून कश्मीर’चे राहुल कौल यांनी ‘सनातन प्रभात’ला सांगितले की, १९९० च्या दशकात झालेल्या हिंदूंच्या नरसंहाराच्या वेळी त्यांना कुणीच वाली नव्हता. आज निहा रैना हिच्यासंदर्भात घडलेली घटना पहाता भारतभरातील हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. राज्य, तसेच केंद्र सरकार यांच्यावर दबाव आणून या प्रकरणी हिंदूंचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. कौल यांनी सरकारकडे मागण्या केल्या की, कश्मीरमध्ये कार्यरत असणार्या हिंदु महिलांना लव्ह जिहादपासून संरक्षण मिळावे. सज्जाद मीरला त्वरित अटक करावी. त्याचा निहा हिच्यासमवेत केलेला निकाह अवैध ठरवावा, तसेच हिंदु मुलींना कायदेशीर सुरक्षेची हमी द्यावी. |
संपादकीय भूमिकाकाश्मीरमध्ये ९० च्या दशकात हिंदूंचा वंशविच्छेद करून, तसेच त्यांना पळवून लावून तेथील हिंदूंची लोकसंख्या अल्प करण्यात आली. आता मात्र आतंकवादासह लव्ह जिहादसारखे शस्त्र वापरून तेथील हिंदूंना नामशेष केले जात आहे, हेच यावरून दिसून येते ! |

ग्राहकाला ४० सहस्र रुपये हानीभरपाई द्या ! – ‘ग्राहक विवाद निवारण आयोगा’चा टपाल कार्यालयाला आदेश
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ आणि ‘लेक लाडकी’ योजनांवर ‘कॅग’चा ठपका !
मुंबईत जुहूच्या समुद्रकिनार्यावर कचर्याचे साम्राज्य !
भारत-पाक सीमेवर असलेल्या बेकायदेशीर मशिदी, दर्गे पाडण्याच्या विरोधातील याचिका राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळल्या
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Vaishno Devi Fake Silver : जम्मू न्यायालयाने पोलिसांकडून मागवल्या नोंदी !