
सांगली – दिव्यांगत्व (अपंगत्व) म्हणजे अपूर्णता नाही, त्यामुळे कोणतेही विद्यार्थी मागे राहू नयेत, विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ महत्त्वाचा आहे आणि तो चांगला होण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्ता आणि ‘रोबोटिक्स या तंत्रज्ञाना’चे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. प्रशिक्षण देत असतांना विद्यार्थ्यांची आकलन क्षमता समजावून घेऊन त्यानुसार प्रशिक्षण द्यावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली, कै. रा.वि. भिडे शाळा, मिरज आणि ‘वर्शिप अर्थ फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. रा.वि. भिडे शाळा या शाळेतील मूक-बधीर विद्यार्थ्यांसाठी आयोजित कृत्रिम बुद्धीमत्ता प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, मिरज तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, जिल्हा दिव्यांग आणि पुनर्वसन अधिकारी श्री. निकम, संस्थेचे सचिव सुरेश आवटी, सहसचिव निरंजन आवटी, ‘वर्शिप अर्थ फाऊंडेशन’चे दिनेश कदम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून ही कार्यशाळा होत असून या प्रशिक्षण कार्यशाळेत श्रवणअक्षम विद्यार्थ्यांसाठी २१ जुलै ते ४ ऑगस्ट या कालवधीत ‘रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स स्मार्ट लॅब’ श्रवणअक्षम विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सांकेतिक भाषांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ग्रामीण शाळा, घरी बसून शिक्षण आणि विशेष शिक्षक यांसाठी हे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली.
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !
Operation Sindoor : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये वीरमरण आलेल्या ६ भारतीय सैनिकांची नावे प्रथमच जाहीर !
महाराष्ट्रात ८ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक मराठी भाषा विकास केंद्र उभारणार !