(म्हणे) ‘शिवाजी महाराजांनी बंगालवर आक्रमण केले होते !’ – Rajdeep Sardesai

  • हिंदुद्वेषी पत्रकार राजदीप सरदेसाई यांच्याकडून मोगलांच्या क्रौर्याला पाठीशी घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान

  • लोकांच्या टीकेनंतर क्षमा न मांगता केवळ ‘बंगाल नाही, तर सुरतवर आक्रमण केल्याची केली सुधारणा !

हिंदुद्वेषी पत्रकार राजदीप सरदेसाई

नवी देहली – पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी अलीकडेच एका पोस्टमध्ये म्हटले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी बंगालवर आक्रमण केले होते. हे वक्तव्य केंद्रशासनाने  एन्.सी.ई.आर्.टी.च्या (नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या) पुस्तकांमधून मोगलांच्या क्रौर्याचे वास्तव दाखवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आले. सरदेसाई यांना हे सहन झाल्याने त्यांनी मोगलांची बाजू घेत छत्रपती शिवाजी महाराजांवर वरील आक्षेपार्ह विधान केले.

ते ‘डेमोक्रॅटिक न्यूज रूम’ या कार्यक्रमात बोलत होते. या वेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा ‘डाकू’ म्हणून उल्लेख करत त्यांच्या सैन्याने बंगालवर आक्रमण करून लूट केली, असे भासवण्याचा प्रयत्न केला.

यानंतर सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर प्रचंड टीका झाल्यावर त्यांनी बंगाल नाही, तर सुरत अशी सुधारणा करण्याची पोस्ट करत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. या वेळी क्षमा मागण्याचेही टाळले.

सरदेसाई यांनी सुधारित पोस्ट मध्ये म्हटले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी बंगालवर नव्हे, तर सूरतवर आक्रमण केले होते. तो मोगल साम्राज्यावर प्रहार होता.’

सरदेसाई यांची सुधारित पोस्ट –

त्याचबरोबर सरदेसाई यांनी शिवाजी महाराजांना त्या युगातील सर्वोत्तम शासक म्हणून वर्णन केले आणि त्यांच्या सैन्य कौशल्याचे अन् जनकल्याणाच्या निर्णयांचे कौतुक केले.

संपादकीय भूमिका

  • असे हिंदुद्वेषी पत्रकार सातत्याने हिंदूंचे खच्चीकरण करत जिहादी, ढोंगी निधर्मीवादी, धर्मांध आदींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारने अशांवर ठोस कारवाई करणे आवश्यक आहे !
  • बंगाल काय किंवा सुरत यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी लुटले, असे कसे म्हणता येईल ? वास्तविक मोगलांनी भारत भूमीला लुटले होते. त्यामुळे ज्यांनी लुटले त्यांच्याकडून ते धन हिसकावून त्याचा रयतेसाठी वापर करणे, याला जनहित म्हणतात ! सरदेसाई यांना हे ठाऊक नाही, असे नाही, तर ते हेतूपुरस्सर ही गोष्ट लपवत आहेत !