Mission Asmita : हिंदु युवतींचे धर्मांतर करणार्‍या टोळीतील १० जणांना ६ राज्यांतून अटक

  • संघटना इस्लामिक स्टेटच्या कार्यशैलीनुसार कार्यरत

  • टोळीचा लव्ह जिहादच्या कारवायांमध्येही सहभाग

  • अमेरिका, कॅनडा यांसह अनेक देशांतून अर्थपुरवठा

  • धर्मांतरित युवतींना कट्टरतावादी कारवायांमध्ये गुंतवले

अटक करण्यात आलेले आरोपी

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – पोलिसांनी अवैधरित्या धर्मांतर करणार्‍या एका टोळीचा बुरखा फाडला आहे. ही टोळी इस्लामी स्टेट या आतंकवादी संघटनेच्या पद्धतीनुसार काम करत होती. या कारवाईत ६ वेगवेगळ्या राज्यांमधून १० जणांना अटक करण्यात आली आहे. मार्च २०२५ मध्ये २ बहिणी, ज्यांचे वय अनुक्रमे ३३ आणि १८ वर्षे होते, त्या बेपत्ता झाल्याची तक्रार आगरा येथील पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी अन्वेषण चालू केले. अन्वेषणात पोलिसांना असे आढळून आले की, बेपत्ता झालेल्या २ बहिणींना धर्म पालटण्यास भाग पाडण्यात आले होते. या प्रकरणी राजस्थानमधून ३, उत्तरप्रदेश आणि बंगाल येथून प्रत्येकी २, तर देहली, उत्तराखंड अन् गोवा या राज्यांतून प्रत्येकी एकाला अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींची ओळख पटली आहे. गोव्यातील आयशा उपाख्य एस्.बी. कृष्णा, कोलकाता येथील अब्बू तालिब खलापर, डेहराडून येथील अबुर रहमान देहरादून, देहलीतील मुस्तफा उपाख्य मनोज, जयपूरमधील महंमद अली आणि जुनैद कुरेशी, अशी अटक करण्यात आलेल्या काही आरोपींची नावे आहेत.

आगराचे पोलीस आयुक्त दीपक कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ‘‘बेपत्ता झालेल्या एका मुलीने सामाजिक माध्यमांत एक छायाचित्र प्रसारित केले होते. त्यामध्ये एका मुलीच्या हातात ‘एके-४७’ रायफल होती. यानंतर पोलिसांच्या अन्वेषणाला वेग आला. दीपक कुमार म्हणाले, ‘‘प्राथमिक अन्वेषणात असे आढळून आले की, या बहिणींना ‘लव्ह जिहाद’ आणि कट्टरतावाद यांत सहभागी असलेल्या टोळीने लक्ष्य केले होते. या टोळीला अमेरिका आणि कॅनडा यांच्यासह अनेक देशांतून निधी मिळत होता. याविषयीचे पुरावे मिळाले आहेत.’’

इस्लामिक स्टेटच्या कार्यशैलीनुसार टोळी कार्यरत

इस्लामिक स्टेट ज्याप्रमाणे कार्यरत असते, त्याप्रमाणे या टोळीमध्ये सहभागी असलेल्या टोळीने ही कुकृत्ये करण्यासाठी विविध भूमिका बजावल्या आहेत, असा संशय आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींचा धर्मांतर आणि लव्ह जिहाद यांसाठी निधी मिळवणे, आश्रय देणे, धर्मांतर अन् अन्य कट्टरतावादी कारवायांना चालना देणे, अशा अनेक कुकृत्यांमध्ये  सहभाग होता. ही टोळी इसिस या क्रूर जिहादी आतंकवादी संघटनेच्या पद्धतीने धर्मांतर करत असल्याचे तपासात दिसून आले आहे, अशीही माहिती पोलीस आयुक्त कुमार यांनी दिली. अटक केलेल्या १० व्यक्तींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

‘मिशन अस्मिता’ अंतर्गत कारवाई चालू !

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन उत्तरप्रदेश पोलिसांनी अन्वेषण गतीने करण्यासाठी विशेष कृती दल आणि आतंकवादविरोधी पथक यांच्या विशेष तुकड्या तैनात केल्या आहेत.

योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चालू केलेल्या ‘मिशन अस्मिता’ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. बेकायदा धर्मांतर, कट्टरतावाद, लव्ह जिहाद आणि राष्ट्रीय सुरक्षेला हानी पोचवण्यासाठी परकीय निधीद्वारे होणारे प्रयत्न यांना आळा घालण्यासाठी सरकारने हा उपक्रम चालू केला आहे.

संपादकीय भूमिका

  • एखाद्या टोळीच्या ६ राज्यांत कारवाया पसरेपर्यंत पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा यांना सुगावा कसा लागला नाही ? हे त्यांना लज्जास्पद !
  • भारतातील धर्मांध मुसलमान हिंदु युवतींचे आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याची अनेक उदाहरणे समोर येत असतांना ‘लव्ह जिहाद अस्तित्वात नाही’, असे म्हणणारे आता गप्प का ?
  • भारतात उत्तरप्रदेश, तसेच अन्य राज्यांमध्ये लव्ह जिहाद आणि धर्मांतरविरोधी कायदे असूनही धर्मांधांना त्यांचे जराही भय नाही, हेच अशा घटनांवरून वारंवार दिसून येते. लव्ह जिहाद रोखण्यासाठी त्यांच्यावर जरब बसेल, अशी कारवाई करणे आवश्यक !