
बरेली (उत्तरप्रदेश) – येथील बहेडीमध्ये ‘म. गांधी मेमोरियल इंटर कॉलेज’मधील शिक्षक रजनीश गंगवार यांच्याविरुद्ध ‘महाकाल सेवा समिती’च्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. रजनीश गंगवार यांचा ‘कावड घेण्याऐवजी ज्ञानाचा दीप लावा’ अशा आशयाचे गीत विद्यार्थ्यांसमोर गातांनाचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर वाद निर्माण झाला. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हा हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारा प्रकार असल्याचे सांगत शिक्षकावर कारवाईची मागणी केली.
🚨 UP teacher booked for telling students: “Don’t carry Kawad, light the lamp of knowledge.”
🛕 Hindu groups say this insults devotees – equating Kawad Yatra with ignorance?
🤔 Would the teacher dare say the same about other faiths?
🪔 Selective 'education'? Or targeted… pic.twitter.com/56hRLTGcpR
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 15, 2025
(म्हणे) ‘विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी गीत गायले !’ – शिक्षकाचे स्पष्टीकरण
या प्रकरणी शिक्षक रजनीश गंगवार यांनी स्वतःला निर्दोष ठरवत सांगितले की, मी विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे प्रोत्साहित करण्यासाठी हे गीत गायले. मी कुठल्याही धर्माच्या विरोधात काहीही बोललो नाही.
जिल्हा विद्यालय निरीक्षक डॉ. अजित कुमार सिंह यांनी सांगितले की, या व्हिडिओची चौकशी केली आहे. शिक्षकाचा हेतू चुकीचा नाही. व्हिडिओ जुनाच आहे; पण आता वाद निर्माण करण्यासाठी तो जाणीवपूर्वक प्रसारित करण्यात आला.
संपादकीय भूमिकाकावड घेणे आणि ज्ञानाचा दीप लावणे , यांचा एकमेकांशी काय संबंध ? कावड घेणारे अशिक्षित असतात, असे शिक्षकाला म्हणायचे आहे का ? अन्य धर्मियांविषयी असे प्रकारचे विधान शिक्षक करू धजावतात का ? |
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा