हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कार्याला साधनेची जोड हवी ! – दादा वेदक, विश्व हिंदु परिषद

  • गुरुचरणी साधनेची गुरुदक्षिणा अर्पण करत पुणे येथे ७ ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात साजरा !

  • श्री. विक्रम भावे लिखित पुस्तकाचे विशेष सादरीकरण आणि शिवकालीन शस्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शन !

मार्गदर्शन करतांना विश्व हिंदु परिषदेचे प्रमुख श्री. दादा वेदक

पुणे, १२ जुलै (वार्ता.) – आपल्याला हिंदु राष्ट्र हवे असेल, तर ‘आदर्शरित्या कसे जगायला हवे’ याचे शिक्षण आपण द्यायला हवे. आपले आचार, उच्चार आणि विचार हे आदर्शच असायला हवेत आणि त्यासाठी आपल्या कार्याला साधनेची जोड हवी. सनातनचे साधक त्याप्रमाणे आदर्श जीवन जगत आहेत. आपण सर्वांनी संघटित झाले पाहिजे. समाजाला धर्मशिक्षण द्यायला पाहिजे. आनंद आणि शांती ही सत्संगातूनच भेटेल, असे प्रतिपादन विश्व हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक यांनी केले. ते चिंचवड (पुणे) येथील ‘समीर बँक्वेट अँड लॉन्स’ या ठिकाणी आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवात बोलत होते.

‘सनातन संस्थे’च्या वतीने १० जुलै या दिवशी पुणे जिल्ह्यात सातारा रस्ता, कोथरूड, सिंहगड रस्ता, जुन्नर, चिंचवड, भोर, तळेगाव या ठिकाणी गुरुपौर्णिमा महोत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, भाजप महिला मोर्चा पुणेच्या सरचिटणीस सौ. उज्ज्वला गौड, लेखक आणि कीर्तनकार श्री. विवेक सिन्नरकर, ‘महाराष्ट्र गोसेवा आयोगा’चे अध्यक्ष श्री. शेखर मुंदडा, ‘गुरुकुलधाम’चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. उमेश महाराज शिंदे, भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष श्री. संजय थोरात आदींनी उपस्थित जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. श्री. नागेश जोशी, श्री. पराग गोखले, श्री. केतन पाटील, चैतन्य तागडे, श्री. सम्राट देशपांडे, कु. क्रांती पेटकर, श्री. महेश पाठक यांनीही उपस्थितांना संबोधित केले.

श्री. विक्रम भावे यांचा सत्कार करतांना विश्व हिंदु परिषदेचे श्री. दादा वेदक

महोत्सवाच्या प्रारंभी श्री व्यासपूजा आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नामजप यज्ञानंतर बहुतेक सर्वच ठिकाणी वातावरणामध्ये सकारात्मक पालट जाणवला. सर्व ठिकाणच्या कार्यक्रमाला मिळून एकूण ३ सहस्र ५०० जिज्ञासू उपस्थित होते.

घोषणा देतांना मान्यवर, साधक आणि जिज्ञासू

खरे हिंदुत्व काय असते हे मला सनातन संस्थेमुळे समजले ! – शेखर मुंदडा, अध्यक्ष, महाराष्ट्र गोसेवा आयोग

मार्गदर्शन करतांना श्री. शेखर मुंदडा

काही वर्षांपासून मी अनेक संस्था आणि संघटना यांच्याशी जोडला गेलेलो आहे, त्या माध्यमातून माझे कार्य चालू आहे; पण खरे हिंदुत्व म्हणजे काय असते हे मला सनातन संस्थेमुळे समजले. मनुष्याच्या आयुष्यात अनेक प्रकारची दुःखे असतात; पण गुरूंवर आपली अढळ श्रद्धा असल्यास आपण तीव्र प्रारब्धावरही सहजतेने मात करू शकतो. जीवनात आपल्याला गुरु मिळणे हे महत्त्वाचे असल्याने त्यांच्या सानिध्यात राहिले पाहिजे. आजच्या या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात गुरूंचे अस्तित्व असल्यामुळे आपल्याला सकारात्मकता आणि आनंद अनुभवता येत आहे. ‘सनातन संस्थे’चे कार्य अद्भूत आहे. साधकांची श्रद्धा मी शब्दात वर्णन करू शकत नाही. सनातन संस्थेची विशेषतः म्हणजे सर्व साधक हे सेवा म्हणून करतात कुणालाही कधी राग आलेला मी पहिलेच नाही. गोवा येथे झालेला ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ सोहळा हा एक गुरुकृपेचा ‘चमत्कारच’ होता आणि हे फक्त गुरुच करू शकतात. इतकी मोठी संख्या असूनही वातावरणात सहजता होती.

आपण वेगवेगळे ‘डे’ (दिन) साजरे करतो; परंतु आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा असून गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपण ‘सेवेचा’ संकल्प करूया. शेखर मुंदडा यांनी कोथरूड येथील गुरुपौर्णिमा महोत्सवात त्यांचा आध्यात्मिक प्रवास वर्णन करतांना आपल्या जीवनात गुरूंचे किती महत्त्व आहे, हे सांगून गुरूंवरची  निष्ठा वाढवण्यासाठी सर्वांना प्रेरणा दिली.

गुरुदेवांच्या कार्यात मुंगीच्या वाट्याने नाही, तर सिंहाच्या वाट्याने उभे रहावे ! – सौ. उज्ज्वला गौड, भाजप महिला मोर्चा, पुणे सरचिटणीस

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी गौरवोउद्गार काढतांना भावविभोर झालेल्या सौ. उज्ज्वला गौड

आज समाजाची स्थिती खूपच ढासळली आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कुटुंबाचा आकार लहान झाला आहे. कुटुंबव्यवस्था बिघडत असल्यामुळे वृद्धाश्रम बंद झाले पाहिजेत, तसेच प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन केले पाहिजे. येणारा काळ आपल्यासाठी अडचणींचा होऊ नये, आपल्यावर कोणती आपत्ती येऊ नये, यासाठी साधना करणे आवश्यक आहे. मनुष्याने त्याचे अष्टसात्त्विक भाव गुरुदेवांबरोबर जोडावेत. गुरूंचे कार्य करण्याची प्रत्येकाची इच्छा असायला हवी. समाजामधील विघातक प्रवृत्तींविरोधात लढण्यासाठी आपल्याला बळ गुरुच पुरवतात त्यामुळे गुरुदेवांच्या कार्यात मुंगीच्या वाट्याने नाही, तर सिंहाच्या वाट्याने उभे रहावे. प्रत्येकाने सेवार्थ कसे रहावे ? कोणती साधना आणि सेवा करावी ? याचे मार्गदर्शन सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत आहेत.

गुरुदेवांचे स्मरण होताच डोळ्यांतील अश्रू आणि हृदय त्यांच्याजवळ गेलेले असते, असा भाव निर्माण होतो. ज्या व्यक्तीची साधना नसेल, ज्यांना सनातन धर्म माहीत नसेल अशांसाठी येणारा काळ अडचणींचा आहे. गुरूंनी हात धरलेला असतो त्या वेळी मनुष्य भरकटू शकत नाही आणि हीच गुरुदेवांनी दिलेली शिदोरी आहे, त्यांनी दिलेली शिकवण आहे. गुरुदेवांच्या चरणी एकच मागणी आहे आमची पुढची पिढी त्यांच्या चरणांशी असावी, साधनेमध्ये सेवेमध्ये असावी.

श्रीराम नामजप करतांना सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनीषा पाठक, श्री. सम्राट देशपांडे (उजवीकडे) आणि जिज्ञासू

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या आठवणीने भावजागृती !

सनातन संस्थेच्या ‘शंखनाद महोत्सवा’च्या आठवणीला उजाळा देतांना सौ. उज्ज्वला गौड गहिवरल्या, त्यांचे डोळे पाणावले. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी बोलतांना त्या भाव स्थितीमध्ये गेल्या. त्यामुळे संपूर्ण वातावरणही भावमय झाले.

‘ईश्वराचा सेवक’ या भावाने मंदिरांचे व्यवस्थापन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ! – दिलीप देशमुख, माजी धर्मादाय आयुक्त

मार्गदर्शन करतांना माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख

‘ईश्वराचा सेवक’ या भावाने आपल्या भागातील मंदिरांचे व्यवस्थापन होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, तरच आपली मंदिरे ही आपल्या धर्मासाठी प्रेरणास्थाने होतील, हे सांगून श्री. दिलीप देशमुख यांनी मंदिर विश्वस्तांचे दायित्व, विश्वस्त म्हणजे काय ? याविषयी उपस्थितांना अवगत केले.

श्री. दिलीप देशमुख यांचा सत्कार करतांना श्री. सोमनाथ लहोट

मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी सर्व हिदूंनी संघटित प्रयत्न करावे ! – ह.भ.प. उमेश महाराज शिंदे, संस्थापक अध्यक्ष, गुरुकुलधाम

मार्गदर्शन करतांना ह.भ.प. उमेश महाराज शिंदे

आज हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण होत आहे, तसेच हिंदूंच्या मंदिरांमधे पावित्र्य राखले जात नाही. मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी आणि ती सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिरे भक्तांच्या स्वाधीन असणे आवश्यक असून मंदिरे ही आता धर्मशिक्षणाची केंद्रे बनली पाहिजेत यासाठी हिंदूंनी संघटित होऊन प्रयत्न करायला हवेत.

सद्यःस्थितीत हिंदूंचे प्रभावी संघटन आवश्यक ! – संजय थोरात, जिल्हाध्यक्ष, भाजप किसान मोर्चा

मार्गदर्शन करतांना श्री. संजय थोरात

आज समाज भरकटला आहे. आपले संस्कार विसरत चालला आहे. त्यामुळे हिंदूंची स्थिती दयनीय झाली आहे. आपले संस्कार आपण विसरल्याने आपला समाज दिशाहीन झाला आहे. त्यासाठी समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे. हिंदूंनी काळानुसार संघटनाला महत्त्व द्यायला हवे.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावर सिद्ध होणे आवश्यक ! – विवेक सिन्नरकर, लेखक, कीर्तनकार

मार्गदर्शन करतांना लेखक, कीर्तनकार श्री. विवेक सिन्नरकर

ईश्वराने अवतार घेऊन शिकवले की, संपूर्ण आयुष्य धर्माच्या उभारणीसाठी वेचले पाहिजे. सर्वस्वाचा त्याग केला पाहिजे ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रातून मिळते. आपण आपल्या धार्मिक कृती करतो का ? हे जो नित्य नियमाने करतो आणि राष्ट्र धर्माची सेवा, संघटन करतो तो हिंदु ! सणवार उत्सव हे फक्त पूजेचे दिवस नसून एक वैचारिक ठेवा आहे. गुरुपौर्णिमा हा त्यातीलच १ दिवस आहे. जो भारत भूमीचे रक्षण करतो तो हिंदु. आपल्याला हिंदूंमध्ये चेतना निर्माण करायला पाहिजे. शारीरिक आणि मानसिक स्तरावर सिद्ध व्हायला पाहिजे, तसेच सीमेवर लढणारा आणि हरिभक्ती करणाराही पाहिजे. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांनी हिंदूंचे संघटन, धर्मशिक्षण यांवर फार मोलाचे कार्य केले आहे, तसेच इतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांना एकत्र आणणे म्हणजे हिंदु राष्ट्र !

लेखक, कीर्तनकार श्री. विवेक सिन्नरकर प्रदर्शनाला भेट देतांना

७ संतांची वंदनीय उपस्थिती !

सातारा रस्ता येथील गुरुपौर्णिमेस उपस्थित पू. उषा कुलकर्णी

सिंहगड रस्ता येथील महोत्सवात सनातन संस्थेच्या पू. (सौ.) मनिषा पाठक, सातारा रस्ता येथील महोत्सवात पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी, चिंचवड येथील महोत्सवात पू. केशव गिंडे आणि सनातन संस्थेचे पू. गजानन साठे, पू. सुलभा जोशी, पू. संगीता पाटील यांची, तर तळेगाव येथील महोत्सवात सनातन संस्थेच्या पू. (श्रीमती) माया गोखले यांची वंदनीय उपस्थिती होती.

वैशिष्ट्यपूर्ण !

सातारा रस्ता

भावपूर्ण नामजप करतांना (डावीकडे) ज्योतिषाचार्य, ग्रामोपाध्याय ह.भ.प. नंदूकाका रहाणे, चिंतामणि प्रासादिक दिंडीचे अध्यक्ष ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज
सातारा रस्ता गुरुपौर्णिमउपस्थिती

८५ वर्षांच्या आजी आजोबांनी स्वागत कक्षावर कार्यक्रम पुष्कळ आवडला, असे सांगितले. या कार्यक्रमात तरुणांचा सहभाग आणि प्रतिसाद खूप चांगला होता. स्वसंरक्षण प्रात्यक्षिक पाहून उपस्थित तरुण पिढी प्रभावीत झाली.

जुन्नर

जुन्नर येथील श्री गुरुपूजन

१. जुन्नर येथील गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला धर्मप्रेमी आणि जिज्ञासू हे पेठ, नारायणगाव, राजगुरुनगर येथून म्हणजे साधारण ५० कि.मी. अंतरावरून आले होते.

२.  श्री. विक्रम भावे लिखित ‘दाभोलकर हत्या आणि मी’ हा ग्रंथ अधिक प्रमाणात वितरीत झाला.

तळेगाव

दहावीतील विद्यार्थ्याचा सत्कार करतांना पू. गोखले आजी

१. ‘असा कार्यक्रम मी आयुष्यात कधीच पाहिला नव्हता, पुष्कळ छान कार्यक्रम झाला’, अशी प्रतिक्रिया राजमाता बचत गटाच्या संस्थापिका अध्यक्षा आणि भाजप स्टेशन विभाग महिला मोर्चाच्या अध्यक्षा निर्मला नितीन पोटे यांनी दिली.

२. ‘सोशल मीडिया कक्षा’वर सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या सामाजिक माध्यमांचे सदस्य झाले, तसेच त्यांनी संकेतस्थळाचे पत्तेही लिहून घेतले.

भोर

१. आळंदेवाडी, आळंदे, खंडोबाची वाडी, गोकवडी, गवडी, केंजळ, मोहरी, शिरवळ, येथील धर्मप्रेमी, जिज्ञासू अधिक संख्येने उपस्थित होते.

२. कार्यक्रम झाल्यानंतर एक वाचक स्वतःहून आवराआवर सेवेत सहभागी झाले, तसेच एका धर्मप्रेमींच्या पत्नीने कार्यक्रम पाहून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याची इच्छा व्यक्त केली.

चिंचवड

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतांना सनातन संस्थेच्या पू. संगीता पाटील !
दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांसमवेत सनातन संस्थेच्या पू. संगीता पाटील

१. भोसरी, वल्लभनगर, मोरे वस्ती, सांगवी, तानाजीनगर येथून एकूण ७ बसगाड्यांनी  जिज्ञासू गुरुपौर्णिमेच्या ठिकाणी आले होते. या बसगाड्यांच्या आयोजनासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेतला.

२. विशेष आकर्षण म्हणून शिवकालीन शस्त्रास्त्रांचे दुर्मिळ प्रदर्शनही भरवण्यात आले होते. त्याला जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

३. काहीजणांनी श्री. विक्रम भावे यांच्याबरोबर आपली छायाचित्रे काढली.

शस्त्र प्रदर्शन
‘समीर बँक्वेट अँड लॉन्स’चे मालक, तसेच भाजपचे युवा नेते श्री. दीपक भोंडवे  कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थित होते. ‘कार्यक्रम इतका शिस्तबद्ध आणि भावपूर्ण होता की, कार्यक्रम सोडून जावेसेच वाटले नाही’, असा अभिप्राय त्यांनी दिला. त्यांनी स्वतःहून ‘गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक स्वागत’ ’ असा मोठा फलक बनवून लावला होता.

विशेष सहकार्य !

१. समीर बँक्वेट अँड लॉन्स चे मालक श्री. दीपक भोंडवे यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

२. कार्यक्रमासाठी विणकर सभागृहाचे मालक श्री. जयंतराव ढगे यांनी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

३. कोथरूड येथील गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी श्रुती मंगल कार्यालयाचे मालक श्री. प्रभाकर काजरेकर यांनी सभागृह उपलब्ध करून दिले.

४. गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी श्री. सचिन चक्कर यांनी धर्मप्रेमींना आणण्यासाठी चारचाकी गाडी उपलब्ध करून दिली. राजगुरुनगरचे आमदार बाबाजीशेठ काळे यांनी धर्माभिमान्यांसाठी बस उपलब्ध करून दिली. तिळवण तेली समाजाचे श्री. तुळजाभवानी सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले.

५. तळेगाव येथील महोत्सवासाठी माननीय श्रीमती स्मिता सचिन शेळके यांनी कार्यालय विनामूल्य उपलब्ध करून दिले. श्री. प्रशांत चाफेकर यांनी मंडपाचे साहित्य, तसेच श्री. राज धांद्रे आणि योगीराज कारंडे यांनी अल्पाहार, तसेच श्री. गिरीश खेर, श्री. मोरेश्वर मराठे, श्री. रवि साबळे यांनी महाप्रसाद उपलब्ध करून दिला. चहाची व्यवस्था श्री. ओंकार मराठे व पाणी व्यवस्था श्री. विशाल मराठे यांनी केली.

६. भोर येथे रामबाग हॉलचे मालक श्री. प्रसाद पवार यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी सभागृह उपलब्ध करून दिले. श्री. विठ्ठल तात्या टिळेकर यांनी सेवेतील साधकांसाठी महाप्रसाद, श्री. अनिकेत तुपे, श्री. संदेश कोंढाळकर यांनी अल्पाहाराची व्यवस्था केली.

गुरुपौर्णिमेला सहकार्य करणारे !

कोथरूड

१. उद्योजक श्री. विजय माझीरे
२. भाजपच्या कोथरूड विभागाच्या सरचिटणीस आणि माजी नगरसेविका सौ. मंजुश्री खर्डेकर
३. श्री. प्रभाकर काजरेकर, श्रुती मंगल कार्यालयाचे मालक
४. माजी नगरसेवक श्री. जयंत भावे
५. उद्योजक श्री. विश्राम कुलकर्णी
६. श्रीमती स्वाती मोहोळ, स्वारद फाऊंडेशनच्या संस्थापिका
७. श्री. रोहन बाफना, एरंडवणे येथील डेक्कन काँक्रीट कंपनीचे मालक
८. श्री. तुषार कुलकर्णी, पवित्रम् फाऊंडेशनचे संचालक

सातारा रस्ता

विद्यमान नगरसेवक श्री. प्रवीण चोरबोले

सिंहगड रस्ता

१. श्री. वैभव कुलकर्णी आणि श्री. निर्मल देशपांडे यांनी विनामूल्य महाप्रसाद दिला.
२. श्री. विकास नाना दांगट यांनी विनामूल्य न्याहरी दिली.
३. श्री. गणेश कुलकर्णी यांनी अल्प दरात सिंहगड रस्ता, माणिक बाग येथील सिद्धार्थ सभागृह उपलब्ध करून दिले.

चिंचवड

१. श्री. कृष्णा इंगोले, परिवार मंगल केंद्र
२. डॉ. थिटे, इन्फिनिटी स्कूलचे संस्थापक
३. सुरुची केटरर
४. श्रीमती अश्विनी जगताप, माजी आमदार
५. माजी नगरसेवक श्री. शीतल शिंदे
६. श्री. संतोष चंदने

जुन्नर

१. श्री. रत्नाकर आवटे, शिवशक्ती नागरी पतसंस्थेचे संचालक
२. श्री. अतूल काळे, भावडीचे प्रखर हिंदुत्वनिष्ठ
३. श्री. मोहन पाटील, तळेगावचे आरोग्य अधिकारी
४. श्री. उमेश कंधारे, पेठ येथील बजरंग दलाचे धडाडीचे कार्यकर्ते
५. श्री. मारुति ढोबळे, इंगळून शाळेचे निवृत्त मुख्याध्यापक
६. जुन्नर न्यायालयातील अधिवक्ता गणेश डेरे

उपस्थित मान्यवर !

चिंचवड

१. अधिवक्ता मोरेश्वर शेडगे, भाजपचे माजी नगरसेवक
२. श्री. विलास मडेगिरी, स्थायी समिती सभापती, भाजप
३. श्री. नीलेश गुलाबराव तरस, शिवसेना

सातारा रस्ता

१. श्री. बाळाभाऊ धनकवडे, विद्यमान नगरसेवक
२. श्री. दत्तात्रय कुलकर्णी, ब्राह्मण महासंघ सदस्य, अध्यक्ष श्री गणपति मंदिर, तुकाईदर्शन
३. श्री. अंकुश जगताप, महाराष्ट्र मंदिर महासंघ सदस्य
४. एअर विंग कमांडर विनायक डावरे (निवृत्त)
५. श्री. मोहन शिंदे, पुणे शहर अध्यक्ष, राष्ट्रीय संघर्ष समिती
६. ह.भ.प. नंदकुमार राहणे महाराज, ग्रामोपाध्याय, फुरसुंगी गाव
७. ह.भ.प. दत्तात्रय चोरघे महाराज, चिंतामणी प्रासंगिक दिंडी
८. प.पू. रामनाथ येवले महाराज
९. श्री. उदय गाडगीळ, व्यावसायिक आणि धर्मजागरन मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
१०. श्री. जयसिंग राजपुरोहित, अध्यक्ष, राजपुरोहित महासंघ, पुणे
११. श्री. माधवजी, अध्यक्ष संस्थापक योग मेडिटेशन बद्रीनाथ उत्तराखंड
१२. विजय शिंदे, माजी नगरसेवक, भाजप

जुन्नर

१. श्री. मधुकर वाडकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष
२. श्री. संजय कर्पे, तिळवण तेली समाजाचे अध्यक्ष
३. श्री. अनिल भगत, विठ्ठल मंदिर सराई पेठचे विश्वस्त
४. श्री. शुभम खत्री, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी
५. श्री. नामदेव खैरे, बजरंग दल, विश्व हिंदु परिषदेचे नारायणगावचे कार्यकर्ते
६. श्री. शाम श्रोत्री, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कुटुंब प्रबोधन प्रमुख
७. श्री. म.पा. काजळे, माजी नगरसेवक जुन्नर, स्वराज्य मित्र मंडळाचे संस्थापक, अध्यक्ष

तळेगाव

१. कार्यक्रमास ‘चैतन्य इंटरनॅशनल स्कूल’चे अध्यक्ष माननीय श्री. भगवान शेवकर आणि सचिव राधिका शेवकर उपस्थित होत्या.

भोर

१. श्री. विनायक सणस, प्रतापगड उत्सव समिती, महाराष्ट्रचे उपाध्यक्ष
२. श्री. बंडूशेठ गुजराती, भोर व्यापारी संघटनेचे अध्यक्ष
३. श्री. विनोद बोडके, सुरेश ॲग्रो कंपनीचे डायरेक्टर
४. श्री. शशिकांत वाघ, मनसे, भोरचे अध्यक्ष
५. श्री. ज्ञानेश्वर खोपडे, पॉलिटेक्निक महाविद्यालय राजगड ज्ञानपिठचे प्राचार्य
६. सौ. पल्लवी फडणीस, भाजपच्या महिला अध्यक्षा
७. श्री. सागर पांगारकर, मोहरी खुर्दचे सरपंच

कोथरूड

१. या कार्यक्रमाला पवित्रम फाऊंडेशनचे अध्यक्ष श्री. तुषार कुलकर्णी, सौ. मंजूश्रीताई खर्डे, श्री. दत्तात्रय उभे, सीमा लिमये, श्री. केतन दत्तात्रय सुर्वे, नगरसेवक श्री. जयंत भावे आणि श्रुती मंगल कार्यालयाचे मालक श्री. प्रभाकर काजरेकर उपस्थित होते.

सिंहगड रस्ता

१. श्री. प्रकाश गोरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सामाजिक कार्यकर्ते
२. श्री. नितीन शेलार मामा, राष्ट्रीय संघाचे संस्थापक अध्यक्ष
३. श्री. शरद दबडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खडकवासला मतदारसंघ
४. श्री. सारंग नवले, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष
५. सौ. पल्लवी चाकणकर, श्री आदिशक्ती सामाजिक प्रतिष्ठान
६. श्री. विद्याधर नारगोलकर, अध्यक्ष, पुणे सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठान
७. श्री. शरद बंकापुरे, ओंकार योग साधनेचे
८. श्री. विश्वजीत देशपांडे, महाराष्ट्र राज्य परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष
९. श्री. अनिल भातकुटे, जरसेश्वर देवस्थानचे पुजारी