BRICS Summit : ब्रिक्स शिखर परिषदेत पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणाचा निषेध

(ब्रिक्स म्हणजे ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांची संघटना)

ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी मोदींसह अन्य जागतिक नेते

रिओ दि जानेरो (ब्राझिल) – येथे ६ जुलैला झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत १२६ कलमी संयुक्त घोषणापत्र प्रसारित करण्यात आले आहे. यात पहलगाम आतंकवादी आक्रमण आणि इराणवरील इस्रायलचे आक्रमण यांचा निषेध करण्यात आला.

आतंकवादाचा निषेध हे आपले तत्त्व असले पाहिजे !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परिषदेत सांगितले की, पहलगाम येथील आतंकवादी आक्रमण केवळ भारतावर नाही, तर संपूर्ण मानवतेवर आक्रमण आहे. आतंकवादाचा सोयीनुसार निषेध न करता ते आपले तत्त्व बनले पाहिजे.

संपादकीय भूमिका

नुसता निषेध न करता पाकिस्तानला ‘आतंकवादी देश’ घोषित करा !