सिंधुदुर्ग जिल्हा एआय प्रणाली वापरण्यासाठी सर्वांना मार्गदर्शक ठरणार !
(एआय – आर्टिफिशियल इंटेलिजन्स – कृत्रिम बुद्धीमत्ता)
सिंधुदुर्गनगरी – कृत्रिम बुद्धीमत्ता (एआय -आर्टिफिशियल इंटेलिजन्स) या भविष्यातील तंत्रज्ञानाची पावले आता सिंधुदुर्गच्या मातीत उमटू लागली आहेत. राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने सिंधुदुर्ग जिल्ह्याला अधिकृतरित्या ‘एआय’ वापरास मान्यता दिली आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रात या प्रणालीवर काम करणारा पहिला जिल्हा ठरला आहे. या प्रणालीच्या जिल्ह्यातील कामकाजाचे सादरीकरण राज्य मंत्रीमंडळासमोर करणार आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.
‘मार्व्हल’ आस्थापन आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये ‘एआय’ प्रणालीविषयीच्या अनुषंगाने सहकार्याचा करार ५ जुलै या दिवशी जिल्हा मुख्यालयात झाला. जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या करारानंतर ‘जिल्ह्याच्या प्रशासकीय यंत्रणेत ‘एआय’ प्रणालीचा वापर कसा होणार’, याविषयी सविस्तर रूपरेषा घोषित करण्यात आली.
आरोग्य, शिक्षण, वाहतूक, कृषी, मत्स्य आणि पोलीस प्रशासन या विभागांमध्ये या प्रणालीचा उपयोग केला जात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यानंतर गडचिरोली जिल्ह्यालाही ही प्रणाली वापरण्यास मान्यता मिळाली असल्याने त्या जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकार्यांचे पथक लवकरच सिंधुदुर्गला भेट देणार आहे, असे मंत्री राणे यांनी या वेळी सांगितले.
शिरगाव येथे उपेंद्र गावकर आणि त्यांच्या कुटुंबावर गोळीबार
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !