|

कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – येथील लिझ कॅमेरॉन नावाच्या एका लेखिकेने स्वत:च्या जीवनावर आधारित एक पुस्तक लिहिले होते. ‘कल्ट ब्राइड : हाऊ आय वॉज ब्रेनवॉश्ड – अँड हाऊ आय ब्रोक फ्री’ (वधू प्रथा : माझे ब्रेनवॉश कसे झाले ? आणि मी त्यातून कशी बाहेर पडले ?), असे या पुस्तकाचे नाव असून यावर येथील ‘चॅनल ७’ने एक माहितीपट बनवला आहे. ‘द कल्ट नेक्स्ट डोअर’ नावाचा हा माहितीपट वर्ष २०११ मधील लिझच्या जीवनावर आधारित असून या माहितीपटामुळे हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.
🚨 Shocking Exposure of Pastor Joshua! ✝️😡
A new documentary, Cult Bride: How I Was Brainwashed – And How I Broke Free, reveals he raped 3 women & manipulated others; including Australian bride Liz Cameron, through Christian indoctrination. 🎥💔
Such abuse by pastors emerges… pic.twitter.com/FgH6Lw0lod
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 4, 2025
ख्रिस्त्यांच्या आहारी गेलेल्या १८ वर्षीय लिझची करुणकथा
१. वर्ष २०११ मध्ये लिझ कॅमेरॉन ही १८ वर्षांची होती. त्या वेळी ती ख्रिस्ती धर्माचा प्रचार करणार्या गटाच्या तावडीत सापडली.
२. या गटातील युजुन नावाच्या महिलेने तिला अत्यंत चतुराईने स्वत:च्या बोलण्यात फसवले आणि लिझ कशी त्यात गुंतत गेली ?, हे तिला कळालेच नाही. एवढे की, कालांतराने तिने घर सोडले आणि कॅनबेरा शहरातील या ख्रिस्ती गटासमवेतच राहू लागली.
३. पुढे तिचा इतका बुद्धीभेद केला गेला की, ‘३ महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा दक्षिण कोरियातील पाद्री जोशुआ हाच तिच्यासाठी सर्वस्व आहे’, असे तिला वाटू लागले.
४. ‘जोशुआचे तिच्यावर प्रेम आहे’, हे तिला सांगण्यात आले. त्यामुळे ‘मी विशेष वधू आहे’, असे तिला वाटून ती स्वत:ला भाग्यवान समजू लागली.
५. पुढे तिला दक्षिण कोरियात नेले असता पाद्री जोशुआने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली. या वेळी लिझला वाटले की, जोशुआसमवेत सर्व काही करणे, हे ‘पवित्र’च आहे. त्यामुळे तिने त्याच्याशी शारीरिक संबंधही ठेवले.
६. कालांतराने लिझची प्रकृती बिघडली. जानेवारी २०१२ मध्ये तिला रुग्णालयात भरती करावे लागले. तिथे तिच्या आईने तिला गाठले आणि चर्चच्या तावडीतून सोडवून घरी नेले. मानसोपचारतज्ञांचे साहाय्य घेतले आणि त्यानंतर तिला सर्व सत्य उमगून ती या सगळ्यातून बाहेर पडली. या वेळी तिला जाळ्यात अडकवण्यासाठी कशा प्रकारे रणनीती आखण्यात आली होती ?, हे संपूर्ण चित्र तिला जोडता आले आणि त्यावर आधारित तिने पुस्तकही लिहिले.
७. लिझचे प्रकरण उघड झाल्यानंतर वर्ष २०२३ मध्ये पाद्री जोशुआ उपाख्य जंग म्युंग-सेओक याला २३ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तो आधीपासून ३ महिलांवर बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी आरोपांवरून शिक्षा भोगत आहे.
८. आज लिझ कॅनबेरा अधिवक्त्याचा व्यवसाय करत असून मानसशास्त्राची पदवीही घेत आहे. धर्मांधांचे षड्यंत्र, तसेच ते लोकांचा बुद्धीभेद कसा करतात ?, याविषयीही ती मार्गदर्शन करते.
९. तिच्या जीवनावर आधारित या प्रसंगावर ‘द कल्ट नेक्स्ट डोअर’ नावाचा एक माहितीपट बनवण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका
|
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली
आरोपीवर दोषारोप निश्चित !
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !