प्रत्येक ५० मीटरवर २ सैनिक तैनात

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – अमरनाथ यात्रेला ३ जुलैपासून प्रारंभ झाला आहे. ३८ दिवसांची ही यात्रा ९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यासाठी आतापर्यंत ३ लाख ५८ सहस्र भाविकांनी नोंदणी केली आहे. गेल्या वर्षी हा आकडा ५ लाख ५८ सहस्र इतका होता. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमणामुळे या वर्षी संख्या घटल्याचे सांगितले जात आहे.
🧵1. Amarnath Yatra begins
Once again, it’s taking place under heavy military protection.Despite being a sacred pilgrimage in a Hindu-majority country, it continues to be held under unprecedented security year after year.
Details in the thread ⬇️ pic.twitter.com/7E3EpHX2rt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) July 3, 2025
या यात्रेचे पहलगाम आणि बालताल असे दोन मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांवर सध्या ५० सहस्र सैनिक तैनात आहेत. श्रीनगर ते बालटाल ११० कि.मी.वर प्रत्येक ५० मीटरवर २ सैनिक आहेत. गेल्या वर्षी प्रत्येक १०० मीटरवर सैनिक होते. या मार्गावर स्थानिक लोकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या देशात हिंदूंची धार्मिक यात्रा सैन्याच्या सुरक्षेत अनेक वर्षे करावी लागणे, हे हिंदूंना लज्जास्पद आहे ! ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे आवश्यक आहे ! |
HJS Demand : कुणाल कामरा आणि प्रकाश राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवा !
Warship ‘Malvan’ : भारतीय नौदलाकडून ‘मालवण’ युद्धनौकेच्या ‘वाघ नख’ दर्शवलेल्या नवीन बोधचिन्हाचे अनावरण
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
कर्णावती (गुजरात) बाँबस्फोट प्रकरणाच्या खटल्याचा निकाल : भारतीय राज्याच्या उत्क्रांतीतील एक धोरणात्मक मैलाचा दगड !