समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांचे बिनबुडाचे आरोप !

मुंबई – कामाच्या ठिकाणी धार्मिक भेदभाव करत नोकरीवरून काढणे, हे नागरी हक्कांचे उल्लंघन आहे. शनिशिंगणापूर मंदिर न्यासाने ११४ इस्लाम धर्मीय कर्मचार्यांना बडतर्फ करून नियमबाह्य कृत्य केले आहे. या निर्णयास भाजप परिवारातील आध्यात्मिक आघाडी, तसेच मुसलमानांची पाठीराखी म्हणून मिरवणारी अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस कारणीभूत असल्याने हे प्रकरण महायुती सरकारच्या कारकीर्दीतील ‘काळा डाग’ म्हणून ओळखले जाईल, असा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी केला आहे. (युती सरकारच्या काळातील मंदिराच्या संदर्भातील हिंदूंच्या लढ्यांना येत असलेले यश म्हणून याकडे पाहिले जाईल ! – संपादक)
यासंदर्भात आमदार शेख यांनी म्हटले आहे की, धार्मिक ध्रुवीकरण करून मते आणि सत्ता मिळवणे, हे त्यामागचे मूळ कारण आहे. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातून या दोन समाजघटकांप्रती भेदभाव चालू आहे. (अल्पसंख्यांक समाजाला मिळत असलेल्या असंख्य सवलतींच्या वेळी दोन समाजांत ध्रुवीकरण होते, असे रईस यांना वाटत नाही का ? – संपादक)
राष्ट्रवादी काँग्रेसला यापुढे मुसलमान मतदान करणार नाहीत’, अशी धमकीही त्यांनी दिली आहे. (राष्ट्रवादी काँग्रेसने अशा भावनिक दबावाला न जुमानता हिंदूंवरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवल्यास हिंदू युतीला मते देतील ! – संपादक)
रईस यांनी मुसलमान कर्मचारी न्यासाच्या घनकचरा, कृषी, व्यवस्थापन विभागात काम करत असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात देवस्थानाच्या चौथर्याची रंगरंगोटी मुसलमान कर्मचार्यांनी करण्यास आक्षेप घेण्यात आला होता. त्यात हिंदु आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप आघाडीवर होते.
संपादकीय भूमिका :
|
डहाणू (जिल्हा पालघर) येथे होणार जगातील सर्वांत मोठ्या कृषी बाजाराची उभारणी !
संपादकीय : हिंदु राष्ट्राची चर्चा हवीच !
हिंदूंना शत्रूबोध नाही !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १५.०७.२०२६)
कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवी मंदिरात पाण्याची गळती !
आषाढी यात्राकाळात पंढरपूरमध्ये मांस, मटण विक्रीवर बंदी !