भारताने इस्रायलप्रमाणे प्रथम पाकची हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट करायला हवी होती ! – Brahma Chellaney

इराण-इस्रायल युद्धावरून संरक्षणतज्ञ ब्रह्मा चेलानी यांचे मत

संरक्षणतज्ञ ब्रह्मा चेलानी

नवी देहली – हवाई युद्धाच्या पहिल्या सिद्धांतानुसार इस्रायलने प्रारंभीच्या आक्रमणात इराणची हवाई संरक्षणप्रणाली आणि ‘बॅलेस्टिक मिसाइल लॉन्चर’ नष्ट केले. यामुळे इराणची प्रत्युत्तर देण्याची क्षमता दुर्बल झाली आणि इस्रायलचा आत खोलवर मारा करण्याचा मार्ग मोकळा झाला; मात्र भारताच्या राजकीय नेतृत्वाने या मूलभूत सिद्धांताकडे दुर्लक्ष केले.

त्यांनी प्रारंभी सशस्त्र दलांना केवळ पाकिस्तानातील आतंकवादी छावण्यांवरच आक्रमण करण्याचे निर्देश दिले. एक असा दृष्टीकोन होता, ज्यामुळे काही भारतीय लढाऊ विमानांची हानी झाली, अशी प्रतिक्रिया संरक्षण क्षेत्रातील तज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी व्यक्त केली.