छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिरांचे रक्षण केले, तसेच आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांचे जीर्णोद्धारही केले. यातून मंदिरांचे महत्त्व लक्षात येते. आज मात्र भारताने ‘सेक्युलर’ वादी राज्यव्यवस्था स्वीकारल्यामुळे मंदिरांवर नवीन पद्धतीने आघात होत आहेत. मंदिरांचे सरकारीकरण आणि त्या मंदिरांत भ्रष्टाचार, पैसे घेऊन ‘व्ही.आय.पी.’ दर्शन, मंदिरांची भूमी बळकावणे यांसह ‘वक्फ बोर्डा’चे अतिक्रमण चालू आहे. यामुळे मंदिर रक्षणासाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ कार्यरत आहे. मंदिरांच्या समस्या सोडवतांनाच महासंघ मंदिरांचे संघटन करत आहे. या दैवी कार्यात आपला सहभाग आवश्यक आहे; म्हणूनच मठ-मंदिराचे विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांनी मंदिर महासंघाच्या कार्यामध्ये सहभागी व्हावे !


मंदिर महासंघाच्या वतीने करण्यात आलेले मंदिर संस्कृतीचे रक्षणकार्य !
१. महाराष्ट्रातील अनेक मंदिरांची भूमी घोटाळेबाजांच्या कह्यात जाण्यापासून वाचवली !
२. कर्नाटकमध्ये महासंघाच्या विरोधामुळे मंदिरांकडून धन घेणारे ‘मंदिर अन् धर्मादाय संस्था कर सुधारणा विधेयक २०२४’ संमत होऊ शकले नाही.
३. मंदिरांचे १५ सहस्रांहून अधिक िवश्वस्त, पुरोहित, धार्मिक संस्था, भक्त यांचे संघटन !
४. विश्वस्त-पुजारी यांच्यासाठी निवासी कार्यशाळांचे आयोजन !
५. महाराष्ट्र, गोवा अन् कर्नाटक राज्यांतील ८०० हून अधिक मंदिरांत वस्त्रसंहिता लागू !
६. मंदिररक्षणासाठी न्यायालयांत याचिका प्रविष्ट केल्या !
– श्री. सुनील घनवट, महाराष्ट्र राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती
मंदिरांच्या प्रभावी संघटनासाठी कृतीशील व्हा !
आपले मंदिर : संक्षिप्त परिचय
महाराष्ट्र मंदिर महासंघ राज्यातील मंदिरांची माहिती एकत्रित करून मंदिरांचे प्रभावी संघटन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, तरी आपल्या ठिकाणच्या मंदिराचा संक्षिप्त परिचय एका ऑनलाईन अर्जाच्या माध्यमातून भरण्याची विनंती महासंघाने केली आहे. पुढील लिंकवर हा अर्ज उपलब्ध करण्यात आला आहे.
लिंक : https://shorturl.at/p5ZCJ
सर्वांनी यात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि मंदिरसंस्कृतीच्या रक्षणाचे धर्मकर्तव्य पार पाडावे !
या अर्जात मंदिराच्या स्थापनेचे वर्ष, मंदिराचे व्यवस्थापन कोण पहाते ? मंदिराची स्वच्छता, तसेच सण-उत्सव, मंदिरांवरील संकटांची माहिती, भाविकांची संख्या, धर्मकार्यात सहभागी होण्याविषयीचे मत इत्यादी प्रश्न विचारले आहेत.
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
जनतेचा पैसा अपात्र बहिणींना !
मोहरमच्या मिरवणुकीत सहस्रो लोकांना ठार मारण्याच्या कारस्थानामागील समाजविघातक प्रवृत्ती !
‘ही जात विरुद्ध ती जात’, असे करून हिंदूंमध्ये फूट का पाडायची ?
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
क्षेत्रमाहात्म्य : जगन्नाथ पुरी !