
अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील भव्य श्रीराममंदिराच्या पहिल्या मजल्यावर ५ जून या दिवशी सकाळी ११.२५ ते ११.४० या अभिजित मुहूर्तावर राम दरबाराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम दरबाराची पूजा केली. या दरबारात भगवान श्रीराम, माता सीता, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न, तसेच हनुमानजी यांच्या मूर्ती आहेत. या वेळी श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष प.पू. गोविंददेव गिरि आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ३५० लोकांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यांपैकी बहुतेक जण न्यासाचे अधिकारी आणि संत होते. राम दरबाराच्या मूर्ती जयपूरमध्ये बनवण्यात आल्या आहेत. या मूर्ती मकराना येथील पांढर्या संगमरवरापासून बनवल्या आहेत. भगवान श्रीराम आणि सीता सिंहासनावर विराजमान आहेत. भरत आणि हनुमान भगवान श्रीरामाच्या पायाजवळ बसले आहेत.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा