
इस्लामाबाद – भारताने पाकिस्तानचे ११ हवाईतळ नष्ट केल्याचा दावा केला होता; मात्र प्रत्यक्षात भारताने अधिक ८ ठिकाणी आक्रमण केले होते, असा खुलासा पाकिस्तानच्या अधिकृत ‘डोजियर’मधून (अधिकृत माहिती देणार्या कागदपत्रांतून) झाला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी पाकिस्तानवर झालेल्या भारताच्या आक्रमणाविषयी एक नवीन माहिती उघडकीस आली आहे. भारताने जी माहिती उघड केली आहे, त्यापेक्षा अधिक ठिकाणांवर आक्रमण झाल्याची माहिती पाकिस्तानच्या डोजियरमधून प्राप्त झाली आहे. पाकिस्तानने ‘ऑपरेशन बुनयान-उन-मरसूर’वर एक डोजियर प्रसिद्ध केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या कारवाईमुळे चिंताग्रस्त झालेल्या पाकिस्तानने भारताशी संपर्क साधला आणि युद्धबंदीची भीक मागितली, हे या डोजियरमधून स्पष्ट झाले आहे.
पाकिस्तानी डोजियरमध्ये दिलेल्या नकाशांमध्ये पेशावर, झांग, सिंधमधील हैदराबाद, पंजाबमधील गुजरात, गुजरानवाला, भावळनगर, अटक आणि चोर येथे आक्रमण झाल्याचे दाखवले आहे.
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim