‘His Story Of Itihaas’ Movie : कोणत्याही अधिकृत बंदीखेरीज ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’सारख्या चित्रपटांचे प्रसारण रोखले जाते !

चित्रपटसृष्टीचे हिंदुद्वेष्टे रूप उघड करणारी नीरज अत्री यांची पोस्ट

प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि लेखक नीरज अत्री (चौकटीत)

नवी देहली – शालेय पाठ्यपुस्तकांद्वारे भारतीय इतिहासाचे विकृतीकरण कसे केले जात आहे, या विषयावर ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ नावाचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट आधारित आहे. तो प्रखर हिंदुत्वनिष्ठ आणि लेखक नीरज अत्री यांच्या जीवनावर आधारित आहे. प्रस्थापित हिंदुविरोधी व्यवस्थेचा चेहरा उघड करत असल्याने या चित्रपटाला अप्रत्यक्ष विरोध केला जात आहे. त्याला चित्रपटगृहे मिळू दिली जात नाहीत, असे चित्र आहे. यावर अत्री यांनी चित्रपटसृष्टीचे हिंदुद्वेष्टे रूप उघड करणारी पोस्ट ‘एक्स’द्वारे केली आहे. ते म्हणाले, ‘‘कोणत्याही अधिकृत बंदीखेरीज केवळ ‘माफियां’च्या इकोसिस्टमद्वारे (प्रणालीद्वारे) ‘हिस स्टोरी ऑफ इतिहास’ यांसारख्या चित्रपटांना कसे गप्प केले जाते, हे समजून घ्या !’’

अत्री यांनी पुढे लिहिले आहे की,

१. लोकांना झंझावाती सत्य सांगणारे चित्रपट चित्रपटगृहांतून कसे हद्दपार केले जातात ?, याचा कधी विचार केला आहे का ?

२. हे आहे त्यांच्यावरील कारवाईचे सूत्र :

अ. पहिल्या शुक्रवारी चित्रपटाला केवळ काही मोजके खेळ (शो) दिले जातात, तेही दूरच्या ठिकाणी आणि मधल्या वेळांना, जसे सकाळच्या सत्रात किंवा दुपारी, जेव्हा बहुतेक लोक येऊ शकत नाहीत.

आ. शनिवारी आणि रविवारी, जेव्हा लोकांना वेळ असतो, त्या दिवशी त्या चित्रपटाचे खेळ रहित केले जातात. ‘शुक्रवारी गर्दी अल्प होती’, असे त्यामागील कारण दिले जाते.

इ. सोमवारपासून जर निर्मात्यांनी संघर्ष करायला आरंभ केला, तर त्यांना परत काही खेळ मिळतात; पण तेही अशा वेळा आणि ठिकाणी जे सामान्य प्रेक्षकांना सोयीस्कर नसतात.

चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक मनप्रीत सिंह धामी यांची ‘x’ वरील पोस्ट पहा –

ई. पुन्हा एकदा शुक्रवार येण्यापूर्वीच… चित्रपटांच्या सूचीतून तो चित्रपट गायब होतो.

ई. या प्रक्रियेत आपल्या परिश्रमाचा पैसा लावणारा (दाऊद इब्राहिम टोळीचा पैसा नव्हे) निर्माता त्याच्या उदरनिर्वाहाचा स्रोत गमावतो. हे एक सुनियोजित रचलेले षड्यंत्र आहे.

३. कोणतीही अधिकृत बंदी नाही. ‘सेन्सॉर बोर्ड’कडून कोणतीही कारवाई नाही. केवळ हुशारीने आणि शांतपणे आवाज दाबला जातो.

४. एखाद्या खोट्या कथानकाचे पितळ उघडे पाडणार्‍या चित्रपटाचे प्रसारण रोखण्यासाठी  अशा प्रकारे यंत्रणा कार्यरत असते.

आता भारतीय इतिहास आणि संस्कृती यांविषयीचे प्रभावी वक्ते अन् लेखक आभास के. मलदहियार यांची ‘x’ वरील पोस्ट पहा –