इटलीतील ‘इटालियन हिंदु युनियन’ संघटनेची घोषणा

रोम (इटली) – भारतात झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा आम्ही निषेध करतो. आम्ही आतंकवादाच्या विरोधात भारतासमवेत उभे आहोत.‘ऑपरेशन सिंदूर’चे आम्हाला कौतुक आहे. आतंकवादाविरोधात लढणे आणि आपल्याला नागरिकांना सुरक्षित ठेवणे, हे प्रत्येक देशातील सरकार अन् सैन्य यांचे कर्तव्य आहे, असे विधान इटलीतील ‘इटालियन हिंदु युनियन’चे अध्यक्ष फ्रैंको दी मारिया जयेंद्रनाथ यांनी ए.एन्.आय. (एशियन न्यूज इंटरनॅशनल) या वृत्तसंस्थेशी बोलतांना केले. आतंकवादविरोधी मोहिमेची माहिती देणारे भारताचे एक शिष्टमंडळ रोम येथे पोचले आहे. त्याचे स्वागत इटालियन हिंदु युनियनने केले. त्या वेळी जयेंद्रनाथ वृत्तसंस्थेशी बोलत होते.
#WATCH | Rome, Italy: Franco Di Maria Jayendranatha, President, Italian Hindu Union, says, "… More than 200,000 Italians are Hindus and we signed an agreement with the Italian Republic. We are a recognised religion, which means we can financially assist our religion… We are… pic.twitter.com/R0KX5GEqh6
— ANI (@ANI) May 28, 2025
हिंदु धर्माला मान्यता मिळालेला इटली हा युरोपातील एकमेव देश !जयेंद्रनाथ पुढे म्हणाले की, इटलीत हिंदु हा मान्यताप्राप्त धर्म आहे. आम्ही इटलीमधील २ लाखांहून अधिक हिंदूंनी इटलीच्या सरकारसमवेत करार केला आहे. या करारामुळे आम्ही देशात आमच्या धार्मिक गोष्टी करू शकतो. आमच्या धर्माला आर्थिक साहाय्य करू शकतो. ज्याप्रमाणे इतर धर्मातील लोक त्यांच्या धर्मासाठी दानधर्म करतात किंवा कर भरतात, तसेच आम्हीही आमच्या धर्मासाठी योगदान देऊ शकतो. हिंदु धर्माला अशा पद्धतीने ओळख आणि मान्यता मिळालेला इटली हा युरोपातील एकमेव देश आहे. |
संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman
(म्हणे) ‘गेल्या वर्षी झालेला संघर्ष पंतप्रधान मोदी आणि पाकचे सैन्यदलप्रमुख असिम मुनीर यांच्यातील संगनमत होते !’ – Imran Khan Sister’s Claim