खासदार असदुद्दीन ओवैसी यांची असिम मुनीर यांच्यावर टीका

रियाध (सौदी अरेबिया) – जेव्हा असिम मुनीर याला पाकिस्तानमध्ये फील्ड मार्शल (सैन्यातील सर्वाेच्च पद) बनवण्यात आले, तेव्हा अमेरिकेने ‘आतंकवादी’ म्हणून घोषित केलेला महंमद एहसान या फील्ड मार्शलच्या शेजारी बसलेला दिसतो. या फील्ड मार्शलशी हस्तांदोलन करतांनाचे त्याची छायाचित्रे आहेत. हे पाकिस्तानच्या आतंकवादी कारवायातील सहभागाचे स्पष्ट पुरावे आहेत. हे आतंकवादी गट तिथे भरभराटीला येत आहेत. त्यांना तिथे प्रशिक्षण दिले जात आहे. भारतात अधिकाधिक हिंदू-मुसलमान दंगली घडवायच्या आणि भारताला अस्थिर करायचे एवढेच त्यांचे काम आहे, अशा शब्दांत ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे, अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी असिम मुनीर यांच्यावर घणाघाती टीका केली. पहलगाम येथील आतंकवादी आक्रमण आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांची माहिती देण्यासाठी भारताचे एक शिष्टमंडळ येथे पोचले आहे. त्यात ओवैसी यांचा समावेश आहे. ते भारतीय दूतावासातील कार्यक्रमात बोलत होते.
"इनका मकसद भारत में हिंदू-मुस्लिम दंगे भड़काना है।" रियाद, सऊदी अरब में बैरिस्टर @asadowaisi ने पाकिस्तान को बेनक़ाब करते हुए बताया कि वह किस तरह आतंकियों को समर्थन देता है। #AllPartyDelegation #SaudiArabia #AsaduddinOwaisi #owaisi #IndiaPakistanWar #AIMIM pic.twitter.com/TBwJ8rVtWO
— AIMIM (@aimim_national) May 29, 2025
ओवैसी पुढे म्हणाले की, जर पाकिस्तानने या आतंकवादी संघटनांना पोसणे थांबवले, तर दक्षिण आशियात स्थिरता येऊ शकते. यामुळे संपूर्ण प्रदेशात प्रगती आणि विकास यांना चालना मिळेल; परंतु दुर्दैवाने पाकिस्तान अजूनही आतंकवादाच्या मार्गावर चालत आहे आणि भारताला अस्थिर करण्याचे प्रयत्न करत आहे.
संपादकीय : ‘टिकी-टाका’ पद्धत यशस्वी !
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
Russia Ukraine War : भारतीय खलाशी असलेल्या नौकेवर रशियाकडून आक्रमण : ६ जण ठार
US Iran War : इराणमधील भारतियांनी शक्य तितक्या लवकर भारतात परतावे ! – भारत
पाक सैन्याने कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या सैनिकांचे मृतदेह हिंदूंच्या स्वाधीन केले ! – Maulana Fazlur Rehman