Demand For Chinese Missile Debris : भारताने नष्ट केलेल्या चिनी क्षेपणास्त्राच्या अवशेषांची अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जपान आदी देशांकडून मागणी

चिनी तंत्रज्ञानाचा करायचा आहे अभ्यास

चिनी क्षेपणास्त्रांचे अवशेष

नवी देहली – भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे त्याने पाकचे ड्रोन आणि क्षेपणास्त्रे यांना हवेतच उद्ध्वस्त केले होते. त्यांचे अवशेष भारतात पडले. भारतीय सैन्याने हे अवशेष कह्यात घेतले आहेत. आता या अवशेषांची मागणी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, न्यूझीलंड, फ्रान्स, जपान आदी देश करत आहेत. यातील ‘पीएल्-१५ई’ हे क्षेपणास्त्र चीनने बनवलेले असून त्याचा अभ्यास करून चीनने कोणत्या तंत्रज्ञानाचा त्यात वापर केला, याची माहिती त्यांना हवी आहे.

९ मे या दिवशी पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील एका शेतातून ‘पीएल्-१५ई’ क्षेपणास्त्राचे तुकडे सापडले. यानंतर १२ मे या दिवशी संरक्षणदलाने पत्रकार परिषदेत प्रथमच याचे अवशेष दाखवले होते.