पंतप्रधान मोदी यांनी आदमपूर (पंजाब) येथील वायूदलाच्या तळाला भेट देऊन केले विधान

आदमपूर (पंजाब) – अधर्माचा नाश आणि धर्माची स्थापना यांसाठी शस्त्र उचलणे ही आपली परंपरा आहे. जेव्हा आपल्या मुली, बहिणी यांचे कुंकू पुसले गेले, तेव्हा आतंकवाद्यांचा फणा आपण त्यांच्या घरात घुसून ठेचला. ते भेदरटपणे लपले होते; पण त्यांनी ज्यांना आव्हान दिले ती हिंदची सेना आहे, हे ते विसरले होते. आपण आतंकवाद्यांचे पंख छाटले आहेत. आतंकवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते येथील वायूदलाच्या तळाला भेट दिल्यावर सैनिकांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
Interacted with the air warriors and soldiers at AFS Adampur. Their courage and professionalism in protecting our nation are commendable. https://t.co/hFjkVIUl8o
— Narendra Modi (@narendramodi) May 13, 2025
या वायूदलावर ड्रोनद्वारे आक्रमण करून ‘एस्-४००’ हवाई संरक्षण यंत्रणा नष्ट केल्याचा दावा पाकने केला होता. भारताने हा दावा फेटाळला होता. पाकला हेच दाखवण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी या तळाला भेट देऊन या तळाची पाक कोणतीही हानी करू शकला नाही, हे दाखवून दिले. पंतप्रधान मोदी यांनी या वेळी सैनिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

⚔️ "It's our tradition to raise arms against evil & uphold Dharma!" – 🇮🇳 PM Modi from Adampur Airbase
🔸 Land of Buddha & Guru Gobind Singh won't bow to evil eyes
💪 '#OperationSindoor' — a symbol of bravery that inspires generations
🔥 Reflects India’s clear policy, strong… pic.twitter.com/0QzkY6p0WC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2025
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,
१. भारत ही भगवान बुद्धाची भूमी आहे, तसेच ती गुरु गोविंदसिंह यांचीही भूमी आहे. भारताकडे डोळे वटारून बघितले, तर त्याचा विनाश होणार.
२. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याला धूळ चारली. भारतीय सैनिक हे नव्या पिढीसाठी तुम्ही नवी प्रेरणा बनले आहेत. सैनिकांनो, तुमच्या पराक्रमामुळे आज ‘ऑपरेशन सिंदूर’चा आवाज प्रत्येक कानाकोपर्यात घुमत आहे. या कारवाईच्या वेळी प्रत्येक भारतीय तुमच्या समवेत होता. प्रत्येक भारतियांची प्रार्थना तुमच्यासमवेत होती. आज प्रत्येक नागरिक सैनिक आणि त्यांचे कुटुंब यांच्याप्रती कृतज्ञ आहे, त्यांचा ऋणी आहे.
३. ‘ऑपरेशन सिंदूर’ ही सामान्य सैन्य मोहीम नाही. ही भारताची नीती, शुद्ध हेतू आणि निर्णायक क्षमता यांचा त्रिवेणी संगम आहे.
‘इंडो-पॅसिफिक’ क्षेत्र : २१व्या शतकातील जागतिक समृद्धी आणि सुरक्षा यांची चावी !
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’