भारत-पाकिस्तान युद्धबंदीवर निवृत्त सैन्यदलप्रमुख आणि विश्लेषक यांचे मत

नवी देहली – भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्वविराम झाल्यानंतर संरक्षणतज्ञ, तसेच भारतीय सैन्याचे निवृत्त अधिकारी यांनी त्यांची मते मांडली आहेत. या मतांमध्ये युद्धविराम अनपेक्षित होता आणि आता भारताला पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी मिळाली होती, असा सूर दिसून आला.
भविष्यात दुसरी कोणतीही संधी नाही ! – जनरल मनोज नरवणे, निवृत्त सैन्यदलप्रमुख
भूमी, समुद्र आणि आकाश यांद्वारे करण्यात येणारी कारवाई थांबवणे ही एक अतिशय स्वागतार्ह घटना आहे. तथापि दीर्घकालीन शाश्वत उपाय शोधण्यासाठी आपल्याला इतर आघाड्यांवर दबाव कायम ठेवावा लागेल.
The cessation of military operations on land sea and air from 1700h today is a most welcome development. However we must continue to maintain the pressure on other fronts to reach a permanent long lasting solution. We cannot keep having an incident based response and losing lives…
— Manoj Naravane (@ManojNaravane) May 10, 2025
आपण घटनांवर आधारित प्रतिक्रिया देऊ शकत नाही आणि आतंकवादी आक्रमणांमध्ये जीव गमावू शकत नाही. हे तिसरे आक्रमण आहे. भविष्यात दुसर्या कोणत्याही संधीची शक्यता नाही.
भारताच्या कारवाईचा कोणता लाभ झाला, हे भविष्यावर सोडतो ! – वेद मलिक, निवृत्त सैन्यदलप्रमुख
Ceasefire 10 May 25: We have left India’s future history to ask what politico-strategic advantages, if any, were gained after its kinetic and non-kinetic actions post Pakistani horrific terror strike in Pahalgam on 22 Apr.
— Ved Malik (@Vedmalik1) May 10, 2025
२२ एप्रिल या दिवशी पहलगाम येथे झालेल्या भयानक आतंकवादी आक्रमणानंतर पाकिस्तानच्या कृतींमुळे जर भारताला कोणता राजकीय-सामरिक लाभ झाला असेल, तर तो विचारण्यासाठी आम्ही भविष्यावर सोडतो.

विजयाच्या जबड्यातून पराभव हिसकावून घेणे ही भारतीय राजकारणाची परंपरा ! – संरक्षण विश्लेषक ब्रह्मा चेल्लानी यांची उपरोधिक टीका
विजयाच्या जबड्यातून पराभव हिसकावून घेणे ही भारतीय राजकीय परंपरा बर्याच काळापासून आहे. त्याची उदाहरणे पुढील प्रमाणे आहेत –
वर्ष १९४८ : भारतीय सैन्य विजयाच्या दिशेने जात असतांना भारताने जम्मू-काश्मीरचे सूत्र संयुक्त राष्ट्रांकडे नेऊन नंतर युद्धबंदीला सहमती दिली.
वर्ष १९५४ : कोणत्याही देवाणघेवाणीविना भारताने तिबेटमधील आपले अतिरिक्त प्रादेशिक अधिकार सोडून दिले आणि ‘चीनचे तिबेट क्षेत्र’ अशी तिबेटला ओळख मिळाली.
Snatching defeat from the jaws of victory has long been an Indian political tradition. Here are just a few examples:
1948: India takes the Jammu and Kashmir issues to the UN and then agrees to a ceasefire when the Indian Army is marching toward victory.
1954: Without any quid…
— Brahma Chellaney (@Chellaney) May 10, 2025
वर्ष १९६० : भारताने सिंधु नदीच्या खोर्यातील चार-पंचमांश पाणी आपल्या कट्टर शत्रू पाकिस्तानसाठी राखीव ठेवण्याचा करार केला.
वर्ष १९६६ : भारताने अत्यंत धोरणात्मक हाजी पीर भाग पाकिस्तानला परत केला, ज्याने १९६५ चे युद्ध चालू केले होते, जे नंतर पाकिस्तानसाठी भारतात आतंकवाद्यांना घुसवण्यासाठी एक केंद्र बनले.
वर्ष १९७२ : भारताने शिमला करारातून पाकिस्तानकडून काहीही न मिळवता वाटाघाटीच्या टेबलावर युद्धातून मिळालेले लाभ पाकला परत केले.

वर्ष २०२१ : वर्ष २०२० मध्ये लडाखमधील महत्त्वाच्या सीमावर्ती भागांत चीनने केलेल्या गुप्त अतिक्रमणानंतर, भारताने मोक्याच्या ठिकाणी असलेल्या कैलास टेकड्या रिकामे केल्या. या टेकड्या इतक्या महत्त्वाच्या होत्या की, वाटाघाटींमध्ये चीनवर दबाव आणण्यासाठी भारताकडे एकमेव सशक्त सूत्र होते. नंतर लडाखच्या काही भागांत चीनने रचना केलेल्या ‘बफर झोन’ला (तटस्थ क्षेत्र जे शत्रूराष्ट्रांना वेगळे करण्याचे काम करते, त्याला) मान्यता दिली.
वर्ष २०२५ : पाकिस्तानने ४ दशकांपासून चालू केलेले ‘सहस्रो जखमांचे युद्ध’ संपवण्यासाठी भारताने ’ऑपरेशन सिंदूर’ प्रारंभ केले; परंतु कोणतेही स्पष्ट उद्दिष्ट साध्य न होता ३ दिवसांनी ते रहित करण्यात आले.
संपादकीय भूमिकापाकिस्तानकडून गेली साडेतीन दशके भारताच्या विरोधात जिहादी आतंकवाद चालू असतांना भारताने कधीही तो मुळासकट नष्ट करण्याचा प्रयत्न केला नाही. आता ती संधी असतांना युद्धविराम करणे, हे जनतेला अनपेक्षित होते. यातून पाकपुरस्कृत आतंकवाद संपलेला नाही आणि तो हिंदूंचे रक्त सांडत रहाणार, हे कटू सत्य कायम रहाते ! |
चिंचवड (पुणे) येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेल्या चादरीची विक्री !
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
CJI In London: लंडन येथे भारताच्या सरन्यायाधिशांच्या कार्यक्रमात गोंधळ : भारतीय उच्चायुक्तालयाचा तीव्र संताप
Putin Praises India : भारतीय हे जगातील सर्वांत प्रतिभावान लोकांपैकी एक आहेत ! – व्लादिमिर पुतिन, राष्ट्राध्यक्ष, रशिया
अमेरिकेतील ‘ब्लूमबर्ग’ या वृत्तसंस्थेकडून भारतविरोधी लेख मागे !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका