प्रभु श्रीरामाचे प्रतिमापूजन, तर सैनिकांसाठी सामूहिक प्रार्थना

पाळधी (जिल्हा जळगाव), ९ मे (वार्ता.) – भारतीय सैन्याच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी येथील श्रीराम मंदिर परिसरात भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले. प्रभु श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करून देशातील सैनिकांसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. कार्यक्रमात गावभरातून आलेल्या नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचा प्रारंभ राष्ट्रप्रेम जागवणार्या प्रस्तावनेने झाला आणि महाआरतीनंतर जयघोषात कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे आयोजन पाळधी गावातील देशप्रेमी नागरिकांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, वारकरी संप्रदाय, गौरक्षा दल पाळधी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाळधी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पाळधी, नरेंद्राचार्य माऊली संप्रदाय, गायत्री परिवार, तसेच राष्ट्रप्रेमी तरुण आणि महिला मंडळ यांनी या कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला.
भगवे ध्वज लावून परिसर सजवलेला होता. ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’ अशा घोषणांमुळे वातावरण भारावून गेले होते. उपस्थित नागरिकांनी दीपप्रज्वलन करून सैनिकांच्या शौर्याला मानाचा मुजरा दिला. या कार्यक्रमामुळे पाळधी गावात राष्ट्रप्रेमाचा उत्सव पहायला मिळाला. पुढील काळातही असे उपक्रम चालू ठेवण्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.
आपणही वानरसेनेचा भाग व्हावे ! – आयोजक
हे युद्ध केवळ सीमेवरील नाही, तर प्रत्येक भारतियाच्या मनातील आहे. प्रभु रामचंद्रांच्या चरणी समर्पित होऊन आपणही वानरसेनेचा भाग व्हावे, हीच खरी देशभक्ती, असे मत आयोजकांनी व्यक्त केले.
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
कोस्टल रोडवरील बोगद्यात चारचाकीला आग; वाहने सोडून लोकांचे पलायन !
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
एन्.एम्.एम्.टी.च्या इलेक्ट्रिक बसला आग
श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या जतन-संवर्धन कामात भारतीय पुरातत्वीय निकष आणि शास्त्रोक्त संवर्धन पद्धती यांचे काटेकोर पालन व्हावे ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन