
व्हॅटिकन – व्हॅटिकनच्या सिस्टिन चॅपलमध्ये (ख्रिस्त्यांच्या उपासनेसाठी वापरण्यात येणार्या खोली किंवा इमारतीमध्ये) झालेल्या कार्डिनल्सच्या (चर्चमधील वरिष्ठ धर्मगुुरुंच्या) परिषदेमध्ये ८ मे या दिवशी नवीन पोपची निवड करण्यात आली. अमेरिकेतील कार्डिनल ६९ वर्षीय रॉबर्ट फ्रान्सिस प्रीव्होस्ट यांची २६७ वे पोप म्हणून निवड झाली आहे. पोप बनणारे ते अमेरिकेतील पहिले कार्डिनल आहेत. त्यांनी स्वतःसाठी ‘पोप लिओ-१४’ हे नाव निवडले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पोप म्हणून निवड झाल्याविषयी कार्डिनल रॉबर्ट प्रीव्होस्ट यांचे अभिनंदन केले. नवीन पोपची निवड होताच व्हॅटिकनमध्ये उपस्थित असलेल्या ४५ सहस्रांहून अधिक लोकांनी टाळ्या वाजवून एकमेकांचे अभिनंदन केले.
इतरांवर दया दाखवा ! – पोप
पोप म्हणून निवड झाल्यानंतर ‘पोप लिओ-१४’ यांनी सेंट पीटर्स बॅसिलिकाच्या बाल्कनीतून स्पॅनिश भाषेत लोकांना संबोधित केले. त्यांनी लोकांना इतरांवर दया दाखवण्याचे आणि प्रेमाने जगण्याचे आवाहन केले. ‘प्रत्येकाच्या हृदयात शांती असो’, असेही नवीन पोप म्हणाले.
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan
राजकारण करायचे असेल, तर गणवेश उतरवून निवडणुकीत भाग घ्या ! – Maulana Fazlur Rehman