
वासना मारायला भगवंताचे अधिष्ठान हाच एक उपाय आहे. वासना ही लाडावलेल्या श्वानाप्रमाणे आहे, त्याला नुसते हड् हड् करून ते बाजूला जात नाही; पण तेही योग्यच आहे; कारण आपणच त्याला लाडावून ठेवले आहे. म्हणून भगवंताच्या पूजेच्या वेळीसुद्धा वासना देवघरात येते.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज